गडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 05:20 PM2021-04-02T17:20:43+5:302021-04-02T17:24:13+5:30

Panchyatsamiti gadhingalj Kolhpaur- केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला दुसरा क्रमांक मिळविला.

Gadhinglaj Panchayat Samiti first in the state | गडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली

गडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली२५ लाखांचे बक्षीस : केंद्राकडून पं. दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार

गडहिंग्लज :केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला दुसरा क्रमांक मिळविला.

जानेवारी, २०२१ मध्ये राज्यस्तरावरील कोकण विभागीय समितीने गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामांची पाहणी केली होती. या यशाबद्दल गडहिंग्लज पंचायत समितीला २५ लाखाचे बक्षीस आणि सन्मानपत्र देवून पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजना, समाजकल्याण, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाकडील योजना, राष्ट्रीय पेयजल योजनांसह सर्व विभागातर्फे राबविलेल्या योजना व कामांची पाहणी करून समितीने मूल्यांकन केले होते. यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यस्तरावरील यशवंत पंचायत राज स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

त्यापाठोपाठ केंद्राच्या पुरस्कारामुळे पंचायत समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. याकामी सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इराप्पा हसुरी यांच्यासह सर्व सदस्य, गटविकास अधिकारी शरद मगर, खातेप्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

५ वर्षात दुसऱ्यांदा यश..!

यापूर्वी २०१४-१५ मध्येही या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत समितीला राज्य पातळीवर पहिल्या क्रमांक मिळाला होता. पाच वर्षानंतर राज्यपातळीवरील या स्पर्धेतील यशाची पुनरावृत्ती झाली आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सदस्यांचा सक्रीय सहभागामुळे शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी सहजपणे करता आली. त्याचे सादरीकरणही उत्तमरित्या केले. सर्वांचे सहकार्य व सक्रिय सहभागामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- शरद मगर,
गटविकास अधिकारी, गडहिंग्लज पंचायत समिती.

Web Title: Gadhinglaj Panchayat Samiti first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.