शाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींचा निधी : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 06:40 PM2020-06-26T18:40:20+5:302020-06-26T18:41:52+5:30

शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आठ कोटींचा निधी प्रस्ताव मिळाला आहे. माणगाव परिषद येथील स्मारकासाठीच्या निधीसोबतच हाही निधी दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Fund of Rs 8 crore for Shahu Samadhisthala: Vishwajit Kadam | शाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींचा निधी : विश्वजित कदम

शाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींचा निधी : विश्वजित कदम

Next
ठळक मुद्देशाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींचा निधी : विश्वजित कदमदसरा चौकात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींना अभिवादन

कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आठ कोटींचा निधी प्रस्ताव मिळाला आहे. माणगाव परिषद येथील स्मारकासाठीच्या निधीसोबतच हाही निधी दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शाहू समाधिस्थळाची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेकडून स्वनिधीतून तब्बल चार कोटी रुपये खर्च करून समाधिस्थळाची पहिल्या टप्प्यातील कामे केली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल सुशोभीकरण करणे, विद्युत रोषणाई, कॉन्फरन्स हॉल, आदींचा समावेश असून या कामांसाठी आठ कोटी ९० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.

याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिकेचे उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक हसिना फरास, मेहजबीन सुभेदार, जय पटकारे, अशोक जाधव, आदी उपस्थित होते.

 

Web Title: Fund of Rs 8 crore for Shahu Samadhisthala: Vishwajit Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.