कोरगांवकर ट्रस्टमार्फत दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:54 PM2021-07-29T13:54:58+5:302021-07-29T13:56:00+5:30

Envoirnement Kolhapur : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत या भावनेतून कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते या वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले.

Free distribution of ten thousand saplings through Korgaonkar Trust | कोरगांवकर ट्रस्टमार्फत दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण

कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यावेळी राज कोरगांवकर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देकोरगांवकर ट्रस्टमार्फत दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरणएचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत या भावनेतून कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते या वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले.

सामाजिक जाणीव आणि पर्यावरण जपणूकीचे भान ठेवून गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरातील कोरगावकर ट्रस्टमार्फत या औषधी वृक्षांची मोफत रोपटी लागवडीसाठी वाटप केली जातात. याही वर्षी सुमारे दहा हजार रोपट्यांचे वाटप करण्यात आले. याबरोबर ट्रस्टच्या वतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे मोफत अन्नछत्राचाही हजारो गरजूंना लाभ मिळत आहे.

कोरोनाच्या काळात प्रामुख्याने जाणवलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याचबरोबर औषधी वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती ट्रस्टचे राज कोरगांवकर यांनी दिली. या विनामूल्य वृक्ष रोप वाटप कार्यक्रमाप्रसंगी हलदार यांनी झाडे केवळ न लावता ती जगवली पाहिजेत असे आवाहन केले तसेच संकटकाळात गरीबांची भुक भागवणारा अन्नछत्राचा उपक्रमही कौतुकास्पद असल्याचे हलदार यांनी सांगितले.

यावेळी एच.पी.सी.एलचे जनरल मॅनेजर ध्रुव कपिल, कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर,आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, आकाश कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, ओम कोरगावकर आदिंसह शिरोली येथील कोरगावकर पेट्रोल पंप येथील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Free distribution of ten thousand saplings through Korgaonkar Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.