५१ मिनिटांत पंधरा किलोमीटर अंतर पार, कोल्हापुरातील साडेचार वर्षांच्या देवराजने केला विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:48 IST2025-06-10T18:47:02+5:302025-06-10T18:48:01+5:30
कोल्हापूर : साडेचार वर्षांच्या देवराज कृष्णराज नलवडे याने पंधरा किलोमीटर अंतर अवघ्या ५१ मिनिटांत पूर्ण करुन इनलाईन स्केटिंगमध्ये नवीन ...

५१ मिनिटांत पंधरा किलोमीटर अंतर पार, कोल्हापुरातील साडेचार वर्षांच्या देवराजने केला विश्वविक्रम
कोल्हापूर : साडेचार वर्षांच्या देवराज कृष्णराज नलवडे याने पंधरा किलोमीटर अंतर अवघ्या ५१ मिनिटांत पूर्ण करुन इनलाईन स्केटिंगमध्ये नवीन विश्वविक्रम केला. फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या रोडवर हा उपक्रम झाला. यापूर्वी त्याने साडेदहा किलोमीटर अंतर ३८ मिनिटांत पूर्ण केले होते.
पाच वाजून पंधरा मिनिटांनी या उपक्रमाची सुरुवात झाली. उद्योगपती धीरज समर्थ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कागलचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, कागल आजरा बँकेचे उपाध्यक्ष सुनील मगदूम, उद्योगपती लुनचंद चालेजा, इचलकरंजी नगरपालिकेचे माजी इंजिनिअर बबन खोत, गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनचे पांडुरंग पाटील उपस्थित होते.
जिल्हा स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते त्याला चिल्ड्रन्स बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविले.