शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत ‘पीएफ’=कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून हालचाली -सौरभ सुमन प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:04 IST

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयाचे कामकाज १५ आॅगस्टपर्यंत पेपरमुक्त करून ते आॅनलाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

ठळक मुद्देसौरभ प्रसाद : आॅनलाईन प्रक्रियेसाठी ५० ‘एमआयडीसीं’मध्ये कार्यशाळा

- प्रविण देसाई -

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयाचे कामकाज १५ आॅगस्टपर्यंत पेपरमुक्त करून ते आॅनलाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या दृष्टीने कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून हालचाली सुरू असून, पुढील महिन्यापासून विभागातील ५० एम.आय.डी.सीं.मध्ये आस्थापना व कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे भविष्य निधी आयुक्त सौरभ सुमन प्रसाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘पीएफ’ कार्यालयाच्या कामकाजासह विविध उपक्रमांचे स्वरूप या संदर्भात त्यांच्याशी साधलेला थेट संवाद...प्रश्न : कोल्हापूर विभागात किती आस्थापना व कर्मचारी आहेत? महिन्याला किती ‘पीएफ’ जमा होतो?उत्तर : भविष्य निधीच्या कोल्हापूर कार्यालयांतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येतात. या विभागात सुमारे ९००० आस्थापना असून, त्यामध्ये जवळपास ११ लाख भविष्य निधीधारक कर्मचारी संलग्न आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४०००, सातारा जिल्ह्यात १५००, सांगली जिल्ह्यात १५००, रत्नागिरीमध्ये १५००, सिंधुदुर्गमध्ये ५०० आस्थापनांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागात सुमारे तीन लाख कर्मचाºयांचा ४५ कोटी रुपये ‘पीएफ’ कोल्हापूर कार्यालयाकडे दर महिन्याला जमा होतो.प्रश्न : ‘पीएफ’संदर्भात कर्मचाºयांनी काय दक्षता घ्यावी?उत्तर : ‘पीएफ’ काढण्यासाठी कार्यालयाने आता ‘आॅनलाईन’ सुविधा केली आहे. ‘पीएफ’चा दावा (क्लेम) करून संगणकीय पोर्टल किंवा ‘उमंग’ अ‍ॅपद्वारे कर्मचारी आपले पैसे काढू शकतात. या आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाºयांना भविष्य निधी कार्यालयाकडे वारंवार फेºया माराव्या लागणार नाहीत. तसेच त्यासाठी प्रत्यक्ष सहीची किंवा कागदपत्रांची गरज लागणार नाही; परंतु त्यांना काही शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाºयांनी सक्रिय (अ‍ॅक्टिव्हेट) करावा लागणार आहे. ‘युनिव्हर्सल’ क्रमांकधारक कर्मचाºयांना आपले आधार क्रमांक व बॅँक खाते क्रमांक हे ‘युनिव्हर्सल’ क्रमांकासोबत लिंक करावे लागणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल क्रमांकातील सीम कार्डला आधार क्रमांक लिंक करावा. तसेच ताराबाई पार्क येथील भविष्य निधीच्या कार्यालयातही सुविधा उपलब्ध केली असून, येथेही कर्मचारी येऊन प्रक्रिया पूर्ण करू शकतात.प्रश्न : कर्मचाºयांचा ‘पीएफ’ भविष्य निधी कार्यालयाकडे जमा न करणाºया आस्थापनांवर काय कारवाई केली जाते?उत्तर : कर्मचाºयांच्या पगारातून ‘पीएफ’ची रक्कम कापून घेऊन ती भविष्य निधी कार्यालयाकडे जमा न करणे हा गुन्हा आहे. असे प्रकार करणाºया आस्थापनांवर भारतीय दंडसंहितेनुसार कलम ४०५ व ४०६ अन्यवे ‘क्रिमिनल ब्रिच आॅफ ट्रस्ट’ अ‍ॅक्टअन्वये कारवाई केली आहे. कोल्हापूर विभागातील ३६ नगरपालिका व नगरपरिषदांना ‘सेक्शन ७ ए आॅफ द अ‍ॅक्ट मे असेसमेंट’द्वारे कंत्राटी कामगारांचे ‘पीएफ’चे पैसे भविष्य निधी कार्यालयाकडे जमा न केल्याबद्दल कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याचा चांगला परिणाम झाला असून इतर आस्थापनांकडून वेळेवर ‘पीएफ’चे पैसे आपल्या कार्यालयाकडे जमा केले जात आहे. तरीही कुठला आस्थापना असा प्रकार करीत असल्यास तेथील कर्मचाºयांनी आपल्याशी संपर्क साधावा.प्रश्न : कर्मचारी निवृत्त झाल्यावर किती दिवसांत त्याच्या खात्यावर ‘पीएफ’ जमा केला जातो?उत्तर : कर्मचाºयांनी निवृत्त झाल्यावर आॅनलाईन पद्धतीने दावा (क्लेम) दाखल केल्यावर पाच दिवसांत संबंधिताला पी.एफ.ची रक्कम मिळू शकते. तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना मिळणारी पेन्शनही १० दिवसांत मिळते. भविष्य निधी कार्यालयातील कर्मचाºयांना त्यांच्या निवृत्तीदिवशी पेन्शनची कागदपत्रे समारंभपूर्वक दिली जातात. ही कागदपत्रे बॅँकेत जमा केल्यावर संबंधितांना तत्काळ पेन्शन सुरू होते.प्रश्न : ‘पीएफ’च्या आॅनलाईन प्रक्रियेबाबत कशा पद्धतीने जनजागृती सुरू आहे?उत्तर : ‘पीएफ’च्या आॅनलाईन प्रक्रियेबाबत पुढील महिन्यापासून भविष्य निधी कार्यालयातर्फे कोल्हापूर विभागातील ५० ‘एमआयडीसीं’मध्ये जनजागृतीपर कार्यशाळा घेऊन मालक व कर्मचाºयांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आधार कार्ड व युनिव्हर्सल क्रमांकाची माहिती एकमेकांना सुसंगत होत नसेल तर याच्या दुरुस्तीसाठी भविष्य निधी कार्यालयात ‘युआयडीआय’ व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आधार सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आस्थापनांच्या मालकांसाठी ‘डिजिटल सिग्नेचर’ किंवा ई-साईन (ई-साक्षांकन) ही सुविधा आपल्या कार्यालयाकडून मोफत देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ९००० आस्थापनांच्या मालकांना मोबाईलद्वारे संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यांनी कर्मचाºयांकडून ही माहिती भरून घेऊन ती द्यायची आहे; परंतु आतापर्यंत फक्त १००० आस्थापनांनीच ही कार्यवाहीकेली आहे. तरी संबंधितांनीभविष्य निधी कार्यालयाच्या ६६६.ीस्रा्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर ‘ई-साईन’ करून घ्यावे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा