मुंबई येथे परीक्षेकरीता जाणाऱ्यांसाठी जादा बसेसची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:44 PM2020-09-29T14:44:17+5:302020-09-29T14:45:30+5:30

मुंबई येथे १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या एमएचटी-सीईटी व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोल्हापुरातून जादा बसेसची सोय केली आहे.

Extra buses for those going to Mumbai for exams | मुंबई येथे परीक्षेकरीता जाणाऱ्यांसाठी जादा बसेसची सोय

मुंबई येथे परीक्षेकरीता जाणाऱ्यांसाठी जादा बसेसची सोय

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई येथे परीक्षेकरीता जाणाऱ्यांसाठी जादा बसेसची सोयराज्य मार्ग परिवहनच्या कोल्हापूर आगाराचे नियोजन

कोल्हापूर : मुंबई येथे १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या एमएचटी-सीईटी व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोल्हापुरातून जादा बसेसची सोय केली आहे.

राज्य शासनातर्फे महाराष्ट्र वैद्यकीय व तंत्र संयुक्त प्रवेश चाचणी १ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुंबई येथे ही प्रवेश चाचणी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जाणार आहेत. याचदरम्यान ४ ऑक्टोबरला केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षाही मुंबई येथे होणार आहे.

त्याकरीता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान कोल्हापूरहून विद्यार्थी या परीक्षेसाठी जातील. त्यांच्या सोयीकरीता कोल्हापूर एस. टी. आगारातून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

Web Title: Extra buses for those going to Mumbai for exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.