अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 09:43 PM2020-07-19T21:43:54+5:302020-07-19T21:46:00+5:30

महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

Exam to be held after December to improve final grade: Uday Samant | अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

googlenewsNext
ठळक मुद्दे अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंतयूजीसीला पाठविणार पत्र : विरोधकांनी राजकारणापेक्षा विद्यार्थिहिताचा विचार करावा

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन वेळा दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अंतिम सत्राच्या परीक्षा सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे सरासरी पद्धतीनेप्रमाणे गुण देऊन या विद्यार्थ्यांना पदवी द्यावयाची. ज्या विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा द्यावयाची आहे, त्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबरनंतर घेतली जाईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीउदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे यूजीसीने सद्य:स्थिती समजून घ्यावी. राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा करून, त्यांच्या शिफारशी घेऊन राज्य सरकारने अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे.

अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना आता पदवी देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने देशभरासाठी घ्यावा. त्याबाबचे पत्र दोन दिवसांत यूजीसीला पाठविणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विद्यार्थिहिताचा विचार करावा, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले

  • या वर्षीचे शुल्क परत मिळेल अथवा पुढील वर्षासाठी ते आकारावे, अशा पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्त राहावे.
  • एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन कॅरी फॉरवर्ड केले जाईल.
  • जे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत त्यांना ग्रेस गुण दिले जातील. तरीही जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल.
  • ग्रंथालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
  • आगामी अधिवेशनात ग्रंथालयाबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.


६० जीआर काढून मागे घेतले नाहीत.

६० जीआर काढून ते मागे घेतले नाहीत. ट्विट करून ते डिलिट केलेले नाही. एक जीआर काढून त्यावर ठाम आहे, असे मंत्री सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या टीकेला उत्तर दिले.

खासदार राऊत यांच्या चिरंजीवाबाबतचा व्हिडीओ एडिट केलेला.

खासदार विनायक राऊत यांच्या चिरंजीवाबाबत व्हिडिओ ट्विट करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? विरोधकांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. राऊत यांचा चिरंजीव निर्व्यसनी आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले

Web Title: Exam to be held after December to improve final grade: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.