सव्वासहा कोटींचा गूळ पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:10 AM2019-11-20T01:10:27+5:302019-11-20T01:10:33+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तीन दिवस हमाली वाढीचे गुºहाळ सुरू असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना ...

With everything, billions of dollars disappear | सव्वासहा कोटींचा गूळ पडून

सव्वासहा कोटींचा गूळ पडून

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तीन दिवस हमाली वाढीचे गुºहाळ सुरू असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना बसत आहे. समितीमध्ये सव्वासहा कोटी किमतीचे ५१ हजार ६२७ गूळ रवे पडून असल्याने समिती, अडते, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तडजोडीनंतर सौदे सुरू झाले तरी खरेदीदारांकडील हमालांनी हमाली वाढीसाठी शनिवार (दि. १६)पासून काम बंद केले आहे.

शनिवारी ३६ हजार ६५५ गूळ रव्यांचा सौदा काढला; पण हमालांनी गुळाची शिलाई आणि वाहतूक बंद केल्याने त्याचा निपटारा होऊ शकला नाही. शनिवार (दि. १६)पासून हमाली वाढीचे गुºहाळ सुरू आहे. सोमवारी (दि. १८) काही शेतकºयांनी आवक आणली; पण सौदा झाला नाही. सोमवारी १३ हजार ३८३ गूळ रवे, तर मंगळवारी १२८९ रव्यांची आवक झाली. सोमवारपासूनची आवक झालेले १४ हजार गूळ रवे सौद्याविनाच पडून आहेत, तर सौदा झालेले ३६ हजार ६५५ रवे असे ५१ हजार ६२७ रवे समितीत पडून आहेत.
आवक सौदा वेळेत न झाल्याने गुळाच्या प्रतीवर परिणाम होऊन दर घसरणार. सौदे सुरू झाले तरी आवक वाढल्याने दर पडणार हे निश्चित आहे. दरातील घसरणीने शेतकºयांना फटका बसणार आहे. खरेदी-विक्री थांबल्याने बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. समितीला तीन-चार दिवसांत लाखोंचा फटका बसला. ज्यांच्यामुळे हा पेच निर्माण झाला, त्यांनाही झळ बसणार आहेच.

Web Title: With everything, billions of dollars disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.