पुढील दोन वर्षांत सोळा राज्यांत निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:29 AM2021-05-08T05:29:24+5:302021-05-08T05:30:13+5:30

राजकीय पक्षांची सत्त्वपरीक्षा : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभांचे तीन टप्पे

Elections in sixteen states over the next two years | पुढील दोन वर्षांत सोळा राज्यांत निवडणुका

पुढील दोन वर्षांत सोळा राज्यांत निवडणुका

googlenewsNext
ठळक मुद्देयापुढे दरवर्षी पण २०२४ पर्यंत तीन टप्प्यात सोळा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

वसंत भोसले

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच, पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या. भाजप आणि काँग्रेससह डावे पक्ष तसेच कांही प्रादेशिक पक्षांची कसोटी यामध्ये लागली. अठराव्या लोकसभेसाठी मे २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी तीन टप्प्यात उत्तर प्रदेशासह देशभरातील सोळा राज्यांत १ हजार ८२३ आमदारांच्या निवडीसाठी निवडणुका होणार आहेत.

यापुढे दरवर्षी पण २०२४ पर्यंत तीन टप्प्यात सोळा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  पुढीलवर्षी (२०२२) १५ मार्च ते १४ जून या कालावधीत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार आहे. या राज्यात ६९० आमदार पदाच्या जागा आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर अन्य चार राज्यांत भाजप गेली चार वर्षे सत्तेवर आहे.
उर्वरित अकरा राज्य विधानसभांच्या निवडणुका २०२३ मध्ये दोन टप्प्यात होणार आहेत. 

कोणत्या राज्यात कधी?
n    मार्च २०२२ - गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश (एकूण जागा ६९०)
n    मार्च २०२३ - गुजरात, कर्नाटक, मेघालय, नागालँड, त्रिपुरा (एकूण जागा ४५४)
n    डिसेंबर २०२३ - छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तेलंगणा (एकूण जागा ७४७)

यश मिळविण्याचे आव्हान 
महाराष्ट्र आणि हरयाणाच्या तसेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका २०२४ मध्येच होणार आहेत. बिहार, दिल्ली आणि आता नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका पुढील लोकसभा निवडणुकांनंतर होतील. भाजपविरोधी काँग्रेसला बळ मिळण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व नसलेल्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत यश मिळविण्याचे आव्हान असणार आहे. 

 

Web Title: Elections in sixteen states over the next two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.