पेरीड येथे एका जागेसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:00 AM2021-01-13T05:00:08+5:302021-01-13T05:00:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात ६५ वर्षांची निवडणुकीची बिनविरोधाची परंपरा असलेल्या पेरीड ग्रामपंचायतीमध्ये एका जागेमुळे यंदा ...

Election for a seat at Perid | पेरीड येथे एका जागेसाठी निवडणूक

पेरीड येथे एका जागेसाठी निवडणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात ६५ वर्षांची निवडणुकीची बिनविरोधाची परंपरा असलेल्या पेरीड ग्रामपंचायतीमध्ये एका जागेमुळे यंदा खंडित झाली आहे. पेरीड गावची लोकसंख्या अडीज हजार आहे. पेरीड ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ साली झाली. गावात ६५ वर्षांपासून कोणत्याही संस्थेची निवडणूक झालेली नव्हती. गावाच्या विकासासाठी गटतट व पक्ष बाजूला ठेवून ग्रामपंचायतीची निवडणूक गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात सर्वांची मते अजमावून सुकाणू समिती निर्णय घेत असे. यंदा मात्र एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरल्यामुळे ६५ वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या गावात एका जागेसाठी मतदान करावे लागणार आहे. विकासकामांत तालुक्यात गाव अग्रेसर आहे. १ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या ग्रामपंचायत प्रशासकीच इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

पेरीड ग्रामपंचायतीला ६५ वर्षांची परंपरा आहे. जुन्या, जाणत्या जेष्ठ मंडळींनी जो आदर्श घालून दिला आहे. आम्ही तो जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.

-सर्जेराव पाटील-पेरीडकर,

माजी बांधकाम सभापती, जिल्हा बँक संचालक, कोल्हापूर

पेरीड गावचे माजी आमदार राऊ पाटील यांनी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. शाहूवाडी पंचायत समितीचे पहिले सभापती, सध्या गावाचे नेतृत्व सर्जेराव पाटील करीत असले तरी गावाच्या विकासासाठी आम्ही सर्व जण एकदिलाने काम करीत आहोत.

-दत्ता राणे,

संचालक, विश्वास सहकारी साखर कारखाना, शिराळा

फोटो

पेरीड, ता. शाहूवाडी ग्रामपंचायतीच्या १ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

Web Title: Election for a seat at Perid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.