गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडच्या सुविधेसाठी प्रयत्न : संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:40 PM2020-12-01T12:40:26+5:302020-12-01T12:42:12+5:30

Coronavirus, gadhinglaj, hospital, kolhapurnews कोरोना महामारीत गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाने उत्कृष्ट काम केले असून येथील दैनंदिन रूग्णसेवादेखील उत्तम आहे. परंतु,बेडस अपुरे पडत असल्यामुळे रुग्णालयातील बेडची संख्या २०० बेड करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

Efforts for 200 bed facility in Gadhinglaj Sub-District Hospital: Sanjay Mandlik | गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडच्या सुविधेसाठी प्रयत्न : संजय मंडलिक

गडहिंग्लज येथे डॉ.प्रियांका पाटील-शिंदे यांचा खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते सत्कार झाला.

Next
ठळक मुद्दे गडहिंग्लजला कोवीड योद्ध्यांचा सन्मानगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडच्या सुविधेसाठी प्रयत्न : संजय मंडलिक

गडहिंग्लज : कोरोना महामारीत गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाने उत्कृष्ट काम केले असून येथील दैनंदिन रूग्णसेवादेखील उत्तम आहे. परंतु,बेडस अपुरे पडत असल्यामुळे रुग्णालयातील बेडची संख्या २०० बेड करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

लोकनेते सदाशिवराव मंडलिक प्रतिष्ठान आणि येथील होप फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेच्या शाहू सभागृहात आयोजित कोवीड योद्ध्यांचा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी,अ‍ॅड. सुरेश कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका,ॲम्बुलन्स चालक,सफाई कामगार, स्वॅब संकलित करणारे कर्मचारी, लॅब टेक्नीशियन ४५० कोवीड योद्ध्यांचा सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा प्रा.कोरी, उपनगराध्यक्ष कोरी व अ‍ॅड. कुराडे यांचीही भाषणे झाली.यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष नचिकेत भद्रापूर, शीलाद पाटणे, अमेय माने, इंद्रजीत मोरे, हर्षद बंदी, यारुक काझी, दिप्ती रिंगणे, श्रीनाथ सुतार उपस्थित होते. रेखा पोतदार यांनी प्रास्ताविक केले.मधुमती देसाई यांनी सूत्रसंचालन केले.विज्ञान मुंडे यांनी आभार मानले.
 

Web Title: Efforts for 200 bed facility in Gadhinglaj Sub-District Hospital: Sanjay Mandlik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.