कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या खांद्यापर्यंत पोहोचून लुप्त झाली. मात्र, किरणांची तीव्रता कमी होती.किरणोत्सवाच्या सातव्या दिवशी ढगाळ वातावरण असल्याने हवेत बाष्प व धुक्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे किरणांची तीव्रता कमी हाेती. सोनेरी किरणांनी सायंकाळी ५:०० वाजता मंदिर महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. ही सूर्यकिरणे हळूहळू ५ वाजून ३४ मिनिटांनी पितळी उंबऱ्यावर पोहोचली. नंतर चरणस्पर्श करत गुडघ्यापर्यंत पोहोचली. सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी देवीच्या हातातील म्हाळुंगापर्यंत, त्यानंतर ५ वाजून ४७ मिनिटांनी देवीच्या उजव्या बाजूला खांद्यापर्यंत पोहोचली. काही वेळ स्थिरावून लुप्त झाली. त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पार पडला.
Web Summary : Kolhapur witnessed the Dakshinayan Kirnotsav, with sunrays reaching Ambabai's shoulder. Cloudy weather reduced intensity. Rays entered at 5:00 PM, touched knees, hands, and shoulder before disappearing at 5:47 PM. Aarti followed.
Web Summary : कोल्हापुर में दक्षिणायन किरणोत्सव में सूर्य की किरणें अंबाबाई के कंधे तक पहुँचीं। बादल के कारण तीव्रता कम रही। किरणें शाम 5:00 बजे प्रवेश कर, घुटनों, हाथों को छूकर 5:47 पर कंधे तक पहुँचीं और लुप्त हो गईं। आरती हुई।