शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननामुळे शेतकरी, वीट व्यावसायिकांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:06 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे वीट भट्टीवरील वीट उचलू न देण्याच्या आदेशाने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.माती उत्खननप्रश्नी उदगाव-चिंचवाडच्या ७६ शेतकºयांच्या सात-बारावर सुमारे साडेबारा कोटींचा दंड चढविण्यात आला आहे, तर गेल्या तीन महिन्यांपासून उदगाव-चिंचवाडमधील असलेल्या वीट भट्ट्यांवरून विटाची विक्री होत होती, तर बुधवारी शिरोळ येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी एकही वीट व्यावसायिकांना उचलू देऊ नका अशा आदेशाने खळबळ उडाली आहे.तर शुक्रवारी उदगाव-चिंचवाडच्या सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन सर्व वीटभट्ट्यांच्या समोरील रस्त्यात जेसीबीच्या साहाय्याने चर काढून रस्ता बंद केला आहे. उदगाव व चिंचवाड परिसरात सुमारे दीडशेहून अधिक वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यावर कोट्यवधी रुपयांचा विटाचा मुद्देमाल आहे. सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन वीट वाहतूक बंद केल्याने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शेतकरी आपली बाजू सोडविण्यासाठी आता कोणत्याही स्तरावर जाण्याच्या तयारीत आहेत. माती उत्खनन व वीटभट्ट्यांमुळे निसर्गरम्य वातावरण पूर्णत: गायब झाले आहे. या कारवाईचे निसर्गप्रेमींकडून स्वागत होत आहे. उदगाव-चिंचवाड माती उत्खनन करण्यासाठी रितसर रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांनाही पाच ते सहापट दंड झाला आहे. हा दंड कमी करण्यासाठी तहसीलदारांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. तसेच रितसर आदेशानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांचा कळीचा मुद्दा बनला असून आता जिल्हाधिकाºयांच्या निर्णयावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.