जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महापुराची दाहकता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 08:07 PM2019-08-14T20:07:29+5:302019-08-14T20:08:01+5:30

पाणी पातळी ५७ फुटांवर जाऊन महापूर येऊनदेखील परिस्थिती शेवटपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे काम या देवदुतामुळेच झाले.

Due to the alertness of the collectors, there is no inflammation of the flood | जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महापुराची दाहकता नाही

जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महापुराची दाहकता नाही

Next
ठळक मुद्देकाही वेळेस रात्री दीड ते दोन वाजता हातावरच भाजी-चपाती खाऊन त्यांनी काम केले आहे.

कोल्हापूर : महापुरामध्ये २४ तास मदत व बचावकार्य करून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोणतीही मनुष्यहानी न होऊ देता, या अस्मानी संकटाचे मोठ्या हिमतीने काम केले आहे. या काळात ते क्वचितच घरी गेले असतील. त्यांनी पूर्णपणेजिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय येथून मदतकार्याची सूत्रे हलविली. पाणी पातळी ५७ फुटांवर जाऊन महापूर येऊनदेखील परिस्थिती शेवटपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे काम या देवदुतामुळेच झाले.

सकाळी सहाला कार्यालयात येऊन कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर त्यांचे काम हे अविरतपणे दुसºया दिवशी सकाळी सहापर्यंत सुरू राहायचे.या काळात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांकडून परिस्थितीबाबत माहिती घेऊन योग्य ती मदत जागेवर पोहोचेल याची दक्षता घेतली. यामध्ये बोटींच्या माध्यमातून स्थलांतर असो किंवा शिबिरांमध्ये अन्नवाटप असो. या काळात त्यांनी स्वत: जेवण्याखाण्याकडेही लक्ष दिले नाही. काही वेळेस रात्री दीड ते दोन वाजता हातावरच भाजी-चपाती खाऊन त्यांनी काम केले आहे.

Web Title: Due to the alertness of the collectors, there is no inflammation of the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.