गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:30 PM2020-01-20T12:30:06+5:302020-01-20T12:31:46+5:30

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले.

Dramatic events for Gokul's election, a revolt of three directors | गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड

गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड

googlenewsNext
ठळक मुद्देगोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंडठराव नेत्यांकडे न देता थेट सहाय्यक निबंधकांकडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले.

अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील या गोकुळच्या दोन ज्येष्ठ संचालकांनी आज आपले ठराव आपल्या नेत्यांकडे न देता थेट थेट सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे दिले आहेत. या प्रकारामुळे गोकुळच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. गोकुळच्या सत्ताधारी गटामध्ये काहीशी फूट पडल्याचे सोमवारी निदर्शनास आले.


पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्याकडे जमा न करता ते थेट सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे दिले आहेत. या प्रकारामुळे गोकुळच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले आहेत. यामध्ये माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी एकत्र येऊन स्वतंत्रपणे निश्चित केलेल्या अधिकाऱ्यांकडे ठराव दाखल केले.

यामुळे सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे. सकाळी नऊ वाजता माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, अरुणकुमार डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील या तिघांनी कार्यकर्त्यांसह येत ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात येत आपले ठराव दिले.

विश्वास पाटील यांनी २९३, अरुण डोंगळे यांनी २0४ ठराव दाखल केले आहेत. उद्या पर्यंत आणखी शंभर ठराव देण्यात येणार असल्याची माहिती या दोघांनी दिली. या वेळी डोंगळे आणि पाटील या ज्येष्ठ संचालकांनी संघाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असून सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे सांगितले. यावेळी विश्वास पाटील यांचे समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, सचिन पाटील, तुकाराम पाटील, धीरज डोंगळे आदी उपस्थित होते

Web Title: Dramatic events for Gokul's election, a revolt of three directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.