डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संचालकपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:49 AM2020-10-20T10:49:37+5:302020-10-20T10:51:16+5:30

Muncipal Corporation, transfar, kolhapurnews डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची सोमवारी पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. राज्य शासनाकडून ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आवडीचे काम मिळाल्याने कलशेट्टी यांनी आनंद व्यक्त केला.

Dr. Appointment of Mallinath Kalshetti as Groundwater Survey Director | डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संचालकपदी नियुक्ती

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संचालकपदी नियुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संचालकपदी नियुक्तीआवडीचे काम मिळाल्याने व्यक्त केला आनंद

कोल्हापूर : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची सोमवारी पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. राज्य शासनाकडून ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आवडीचे काम मिळाल्याने कलशेट्टी यांनी आनंद व्यक्त केला.

डॉ. कादंबरी बलकवडे यांची दहा दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या तडकाफडकी बदलीचे शहरात पडसाद उमटले. विविध संघटनांकडून डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द करण्यासाठी निदर्शने झाली.

डॉ. कलशेट्टी यांनी अवघ्या पावणे दोन वर्षांत शहरातील नागरिकांची मने जिंकली होती. त्यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहिमेला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामान्य नागरिकांना ते सहज उपलब्ध होत असत. प्लास्टिक मुक्तीसाठी त्यांनी भरीव काम केले.

गेल्या दहा दिवसांपासून त्यांची नेमकी कुठे नियुक्ती होणार याकडे लक्ष लागून होते. कोल्हापुरातच त्यांची बदली होईल, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली होती; परंतु सोमवारी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा (पुणे) येथे केली.

Web Title: Dr. Appointment of Mallinath Kalshetti as Groundwater Survey Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.