आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल चौकातील डीपीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:30 AM2021-03-27T11:30:21+5:302021-03-27T11:32:03+5:30

fire Kolhapur-आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील चौकात असणाऱ्या डीपीने शुक्रवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. काही क्षणात मोठ्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग विझविली.

DP at Irwin Christian High School Square on fire | आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल चौकातील डीपीला आग

 कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील डीपीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली.

googlenewsNext
ठळक मुद्देआयर्विन ख्रिश्चन हायस्कूल चौकातील डीपीला आगअग्निशमन दलाने वेळीच धाव घेत विझविली आग

कोल्हापूर : आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील चौकात असणाऱ्या डीपीने शुक्रवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. काही क्षणात मोठ्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग विझविली.

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळ महावितरणचा डीपी आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. त्यामुळे चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद केली. तत्काळ अग्निशमन दलास वर्दी देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाचे फायर फायटर आले.

यावेळी अग्निशमन दलाच्या दस्तगीर मुल्ला, शिवाजी नलवडे, गिरीश पोवार, अभय कोळी व विशाल चौगुले या जवानांनी ही आग काही काळात आटोक्यात आणून विझविली. ही आग शार्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
 

Web Title: DP at Irwin Christian High School Square on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.