ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, शिवसेनेची मागणी हाथरस येथील नराधमास प्रतीकात्मक फाशी
कोल्हापूर : हाथरस येथील घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील गोरगरीब जनता सुरक्षित नसून तेथील भाजपचे योगी सरकार बरखास्त करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील नराधमास प्रतीकात्मक फाशी देत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची भाषणे झाली.
यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, दत्ताजी टिपुगडे, अवधूत साळोखे, शशिकांत बीडकर, राजेंद्र जाधव, दिनेश परमार, मंजीत माने, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, स्मिता सावंत, आदी उपस्थित होते.
Web Title: Dismiss the Yogi government in Uttar Pradesh, Shiv Sena demands
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.