गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची थेट केंद्रीय मंत्रालयाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 06:45 PM2020-10-05T18:45:25+5:302020-10-05T18:47:38+5:30

kolhapur news, inquiry, Union Ministry, street dog death गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी कोणी तक्रार करु शकेल असे वाटते का? परंतु कोल्हापूरातील एका व्यक्तीने गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय मंत्रालयाकडे केली आणि केंद्रानेही चौकशीचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

Direct inquiry by Union Ministry into the death of a street dog | गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची थेट केंद्रीय मंत्रालयाकडून चौकशी

गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची थेट केंद्रीय मंत्रालयाकडून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देगल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची थेट केंद्रीय मंत्रालयाकडून चौकशीचौकशीसाठी तीन उपायुक्त दजाचे अधिकारी नियुक्त

कोल्हापूर : गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी कोणी तक्रार करु शकेल असे वाटते का? परंतु कोल्हापूरातील एका व्यक्तीने गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय मंत्रालयाकडे केली आणि केंद्रानेही चौकशीचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कोल्हापूर शहरातच नव्हे, तर प्रत्येक शहरात मोकाट कुत्री दिवसरात्र फिरत असतात. रात्रीेबेरात्री या कुत्र्यांचा उच्छाद सहनही करावा लागतो. म्हणूनच वेळोवेळी महानगरपालिका कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहिम राबवत असते. पकडलेल्या कुत्र्यांसाठी निर्बिजीकरणाचीही वेगळी मोहिम सुरु असते. ही कुत्री परत त्यांच्या त्यांच्या जागी जातात.

अशाच एका कुत्र्याचे निर्बिजीकरण केल्यानंतर महानगरपालिकेच्या यंत्रणेने त्याला त्याच्या मूळ जागी म्हणजे राजेंद्रनगर परिसरात सोडले. काही दिवसांनी या कुत्र्याचा मृत्यू झाला. याची दखल घेत एका प्राणीप्रेमी व्यक्तीने घेतली आणि त्याने ईमेलद्वारे थेट दिल्लीदरबारीच तक्रार केली, की या कुत्र्याचा मृत्यू कसा झाला.

केंद्र सरकारनेही तत्काळ याची दखल घेत राज्य सरकारला चौकशीचे आदेश दिले. राज्याकडून महापालिका यंत्रणेकडे हे आदेश येताच तीन उपायुक्त दजाचे अधिकारी यासाठी नियुक्त करण्यात आले. आता सध्या या कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी सुरु असल्याची माहिती महानगरपालिकेमार्फत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत कोणी तक्रार केली, हे मात्र गुलदस्तातच राहिले आहे.

याप्रकरणी चौकशी अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. काहीही असले तरी यात दोषी ठरणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे, हे नक्की.

Web Title: Direct inquiry by Union Ministry into the death of a street dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.