डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम : ८५ ठिकाणी आढळल्या आळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:19 PM2020-11-04T19:19:35+5:302020-11-04T19:20:13+5:30

MuncipaltyCarporation, dengue, kolhapurnews कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरु केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत बुधवारी शहरातील नऊ प्रभागातील १२६७ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १९४८ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ८५ ठिकाणी डेंग्युच्या आळया आढळून आल्या.

Dengue Prevention Campaign: Larvae found in 85 places | डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम : ८५ ठिकाणी आढळल्या आळ्या

डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम : ८५ ठिकाणी आढळल्या आळ्या

Next
ठळक मुद्देडेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम ८५ ठिकाणी आढळल्या आळ्या

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरु केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत बुधवारी शहरातील नऊ प्रभागातील १२६७ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १९४८ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ८५ ठिकाणी डेंग्युच्या आळया आढळून आल्या.

डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेमध्ये डास अळी सर्वेक्षण, औषध फवारणी व धूर फवारणी तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बांधण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स नारळाच्या करवंट्या फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही आशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंगू चिकनगुनियावर नियंत्रित ठेवण्यास मदत करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: Dengue Prevention Campaign: Larvae found in 85 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.