शिवाजी विद्यापीठातील सुबोध प्रभू यांना दलाई लामा फेलोशीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:27 PM2021-04-07T18:27:16+5:302021-04-07T18:28:51+5:30

Shivaji University Kolhapur- शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागात सहयोगी प्राध्यापक (ॲडजंक्ट प्रोफेसर) आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ. सुबोध (शिवदत्त) प्रभू यांची दि दलाई लामा फेलोशीपसाठी निवड झाली आहे. त्याव्दारे ते न्यूरोलॉजिकल को-रिलेट्स ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी या विषयावरील शास्त्रीय शोधप्रबंध वर्षभरात सादर करतील.

Dalai Lama Fellowship to Subodh Prabhu from Shivaji University | शिवाजी विद्यापीठातील सुबोध प्रभू यांना दलाई लामा फेलोशीप

शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुबोध प्रभू यांची दि दलाई लामा फेलोशीपसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी पी. एस. पाटील, विजय फुलारी, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देस्कूल ऑफ नॅनोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक आंतरविद्याशाखीय संशोधन करणार

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागात सहयोगी प्राध्यापक (ॲडजंक्ट प्रोफेसर) आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ. सुबोध (शिवदत्त) प्रभू यांची दि दलाई लामा फेलोशीपसाठी निवड झाली आहे. त्याव्दारे ते न्यूरोलॉजिकल को-रिलेट्स ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी या विषयावरील शास्त्रीय शोधप्रबंध वर्षभरात सादर करतील.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून दरवर्षी आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी एका संशोधकाची फेलो म्हणून निवड केली जाते. यंदा या फेलोशीपसाठी डॉ. प्रभू यांची निवड झाली. त्यांनी फ्रान्समध्ये ग्रेनोबल येथे औषधांना दाद न देणाऱ्या आणि मेंदू शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या फिट्स यांवर डी.बी.एस. या नाविन्यपूर्ण उपचार पद्धतीबाबत सहा वर्षे संशोधन केले. यासाठी त्यांना फेडरेशन ऑफ युरोपियन न्यूरो सायन्स सोसायटीजची वैयक्तिक ग्रँट मिळाली. फेलोशीपसाठी निवड झाल्याबद्दल डॉ. सुबोध प्रभू यांचा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचा सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, आदी उपस्थित होते.
 

Web Title: Dalai Lama Fellowship to Subodh Prabhu from Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.