बापरे! पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:25 AM2021-05-10T04:25:16+5:302021-05-10T04:25:16+5:30

कोल्हापूर : पोलीस ठाण्याच्या आवारातील अपघातग्रस्त चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करण्याचे धाडस दोघा चोरट्यांनी दाखवले. मात्र, ही चोरी करताना ...

Dad! Attempted theft in the premises of the police station | बापरे! पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरीचा प्रयत्न

बापरे! पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरीचा प्रयत्न

Next

कोल्हापूर : पोलीस ठाण्याच्या आवारातील अपघातग्रस्त चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करण्याचे धाडस दोघा चोरट्यांनी दाखवले. मात्र, ही चोरी करताना दोघा पोलिसांच्या दक्षतेमुळे हे चोरटे पोलिसांना रंगेहाथ सापडले. करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली असून, त्या दोघा चोरट्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत शशिकांत तलवार (४०, रा. शिवाजी पुतळा परिसर, कोल्हापूर. मूळ रा. भीमनगर, निपाणी, कर्नाटक), रोहित तानाजी कोकीतकर (२२, रा. शिवाजी मार्केट परिसर, कोल्हापूर. मूळ रा. फुलेवाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात काही अपघातग्रस्त चारचाकी वाहने न्यायालयीन प्रक्रियेसाठी ठेवली आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरात कोणी नसल्याचे पाहून चंद्रकांत तलवार व रोहित कोकीतकर या दोघा संशयितांनी अपघातग्रस्त वाहनांच्या बॅटऱ्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचेवेळी करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉस्टेबल सुनील देसाई व फिरोज मुल्ला येथे आले. ह्या दोघांना बॅटऱ्या चोरताना रंगेहाथ पकडले. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांना अटक केली.

फोटो नं. ०९०५२०२१-कोल-चंद्रकांत तलवार (आरोपी), रोहित कोकीतकर (आरोपी)

===Photopath===

090521\09kol_13_09052021_5.jpg~090521\09kol_14_09052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०९०५२०२१-कोल-चंद्रकांत तलवार (आरोपी), रोहीत कोकीतकर (आरोपी)~फोटो नं. ०९०५२०२१-कोल-चंद्रकांत तलवार (आरोपी), रोहीत कोकीतकर (आरोपी)

Web Title: Dad! Attempted theft in the premises of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.