कोल्हापूर जिल्ह्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू, सविस्तर आदेश जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:46+5:302021-04-15T11:28:07+5:30

CoronaVirus collector Kolhapur: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली संचारबंदी बुधवारपासून जिल्ह्यात लागू करण्यात आली. ही संचारबंदी १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचा सविस्तर आदेश रात्री जाहीर केला.

Curfew imposed in the district till May 1 | कोल्हापूर जिल्ह्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू, सविस्तर आदेश जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू, सविस्तर आदेश जाहीर

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागूसविस्तर आदेश जाहीर

कोल्हापूर : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली संचारबंदी बुधवारपासून जिल्ह्यात लागू करण्यात आली. ही संचारबंदी १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचा सविस्तर आदेश रात्री जाहीर केला.

जिल्ह्यामध्ये बुधवारपासून हे कलम १४४ लागू करण्यात आले असून कोणत्याही नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहतील. सरकारी तसेच महत्त्वाच्या सेवा आणि आस्थापनांना सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. घरेलू कामगार, वाहन चालक यांना स्थानिक परिस्थितीनुसार व मान्यतेनुसार काम करता येईल. असे आदेशात नमूद आहे.

हे सुरू राहील

  • रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने,
  • औषधे निर्मिती लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे यांचे उत्पादन व वितरण
  • वृत्तपत्रांची छपाई व वितरण
  • हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्य पदार्थांच्या गाड्या येथील केवळ पार्सल सेवा
  • शासकीय व खासगी पशुवैद्यकीय दवाखाने,
  • किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि खाद्य दुकाने
  • विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बस, माल वाहतूक
  • बँका, वित्तीय बाजाराशी निगडीत संस्था , स्टॉक एक्स्जेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इ.
  •  शेती व संबंधित सेवा व दुकाने
  • व्यापारी मालाची आयात निर्यात, ई कॉमर्स
  •  पेट्रोलपंप ,कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी सेवा.

 

हे बंद राहील

  • सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि प्रेक्षागृहे, मनोरंजन पार्क, आर्केडस्, व्हिडीओ गेम्स पार्लर्स, वॉटर पार्क
  •  क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले
  •  चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरण.
  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने
  • सर्वधर्मीय धार्मिक - प्रार्थना स्थळे
  • केशकर्तनालय,स्पा, सलून, ब्युटी पार्लर
  • शाळा आणि महाविद्यालये
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम

 

उत्पादन व बांधकाम क्षेत्र

अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली उत्पादने, पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. निर्यात करण्यात येणारी उत्पादने, औद्योगिक आस्थापने सुरू राहतील मात्र येथील कामगारांच्या राहण्याची व्यवस्था उद्योग परिसरात करण्यात यावी. कामगारांना बाहेर जाता येणार नाही. ज्या बांधकाम साईटवर कर्मचारी व मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल; मात्र या कामगारांना बाहेर फिरण्यास मनाई असून केवळ साहित्याची वाहतूक करता येईल.

 

Web Title: Curfew imposed in the district till May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.