शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगाम आॅक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:41 IST

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू करावा लागेल, असे निर्देश पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी गुरुवारी कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू करावा लागेल, असे निर्देश पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी गुरुवारी कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्रधान कार्यालयात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाºयांची बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ, कार्यालयीन अधीक्षक रमेश बारडे, लेखापरीक्षक विजय पाटील, विभागीय कृषी अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, आदींची होती.साखर आयुक्तालयाचे सहसंचालक डी. आय. गायकवाड यांनी दोन टप्प्यांत शेती अधिकाºयांसोबत बैठक घेऊन ऊस उत्पादनाबाबत माहिती घेतली. यावर जवळपास सर्वच अधिकाºयांनी यंदा उसाचे बंपर उत्पादन होणार असल्याचे सांगितले.गतवर्षी कोल्हापूर व सांगलीमध्ये २१३.२७ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १३७.९८ लाख टन व सांगली जिल्ह्यातील ८०.२९ लाख टन गाळप झाले होते. त्या तुलनेत यंदा म्हणजे २०१८-१९ साठी १३७.९४ लाख टन कोल्हापूर जिल्ह्यात व ८९.८१ लाख टन सांगली जिल्ह्यात असे मिळून २२७.८५ लाख टन ऊस उत्पादन होणार आहे.गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात ९.६२ लाख टन व कोल्हापूर जिल्ह्यात ४.९६ मेट्रिक टन असे १४.५८ लाख टन उत्पादन वाढले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने ऊस गळीत हंगाम आॅक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरू करावा, असे निर्देश सर्व शेती अधिकाºयांना दिले, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.यंदा ऊसतोडणी यंत्रांवर भरमराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, आदी भागांतील ऊसतोडणी मजूर यावर्षी येण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त हार्वेस्टर (ऊसतोडणी यंत्र)चा वापर करण्याची गरज आहे. सध्या कारखान्यांकडे २५२ हार्वेस्टर उपलब्ध असून ३००ची मागणी करण्यात आली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.