Coronavirus Unlock : हॉटेल सुरु करण्याचीही व्यावसायिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:25 PM2020-07-02T17:25:07+5:302020-07-02T17:26:31+5:30

 कोल्हापूर जिल्ह्यातील दुकानांना सायंकाळी सातवाजेपर्यत परवानगी मिळावी, तसेच हॉटेल व्यवसाय सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करु व राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

Coronavirus Unlock: Professionals also demand to start a hotel | Coronavirus Unlock : हॉटेल सुरु करण्याचीही व्यावसायिकांची मागणी

 कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, संजय शेटे, आनंद माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देहॉटेल सुरु करण्याचीही व्यावसायिकांची मागणीदुकानांची वेळ वाढवण्याबाबत योग्य तो निर्णय घेवू-जिल्हाधिकारी दौलत देसाई

 कोल्हापूर : जिल्ह्यातील दुकानांना सायंकाळी सातवाजेपर्यत परवानगी मिळावी, तसेच हॉटेल व्यवसाय सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करु व राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूर चेंबस ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज तसेच कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेवून त्यांना या मागणीचे निवेदन दिले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

कोल्हापूर चेंबस ऑफ कॉमर्सने दिलेल्या निवेदनात व्यवसाय व उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी सर्व व्यापारी आस्थापने व दुकानांना सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची व हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल सुरु करण्याची परवानगी मागितली आहे.

सध्या जिल्ह्यात चहागाडी, टपरीवाले, नाष्टा सेंटरवाले यांनी टेंम्पोसह अन्य गाड्यातून रस्त्याकडेला, चौक, बागा या ठिकाणी पार्सलच्या नावाखाली हॉटेलचा धंदा सुरु केला आहे. अनलॉकमध्ये सर्वच उद्योग व व्यवसाय सुरु झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनाही मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करू तसेच राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून निर्णय घेवू असे सांगितले. यावेळी चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, आनंद माने, उदयसिंह निंबाळकर, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, आशिष रायबागे, अरुण चोपदार यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.

 

Web Title: Coronavirus Unlock: Professionals also demand to start a hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.