corona virus : कोल्हापूरचा युनिक पॅटर्न, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:17 AM2020-07-01T11:17:13+5:302020-07-01T11:19:27+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील मंत्र्यांनी तसेच पोलीस, आरोग्य, महसूल या प्रशासनांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. यामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला असून यापुढेही असेच चांगले काम करा असे गौरवोदगार गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी केले.

corona virus: Unique pattern of Kolhapur, appreciation from Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai | corona virus : कोल्हापूरचा युनिक पॅटर्न, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुक

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुकमहसूल वाढवण्याच्या सुचना

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील मंत्र्यांनी तसेच पोलीस, आरोग्य, महसूल या प्रशासनांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. यामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला असून यापुढेही असेच चांगले काम करा असे गौरवोदगार गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी चांगलं प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. रात्रंदिवस फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली आहे. विशेषत: पोलीस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता घ्या.

जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी १८ प्रवेश नाक्यावरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या संगणक प्रणालीद्वारे तपासणीबाबत तसेच जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कोरोनाबाबतची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनीही विभागांची माहिती सादर केली. सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही विभागाचा आढावा दिला.


 

Web Title: corona virus: Unique pattern of Kolhapur, appreciation from Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.