corona virus -मध्यवर्ती बसस्थानकांत बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:25 PM2020-03-19T16:25:00+5:302020-03-19T16:25:54+5:30

पुणे, मुंबई अशा कोरोनाची लागण झालेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक येथे आरोग्य पथकांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली.

corona virus - Travelers coming from out of town in central bus stations | corona virus -मध्यवर्ती बसस्थानकांत बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना लक्ष

कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे पुणे, मुंबई अशा कोरोनाची लागण झालेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य पथकांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली. (छाया : अमर काबंळे)

Next
ठळक मुद्देcorona virus -मध्यवर्ती बसस्थानकांत बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना लक्षमहानगरपालिकेच्या वतीने आरोग्य पथकांची नियुक्ती

कोल्हापूर : पुणे, मुंबई अशा कोरोनाची लागण झालेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक येथे आरोग्य पथकांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली.

विविध ठिकाणच्या प्रवाशांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे; त्यामुळे खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकावर या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकांत आलेल्या प्रवाशांना कोरोनाबाबत काही शंका असेल, त्यांना या पथकांद्वारे मार्गदर्शन केले जाते. तसेच गेली आठ - दहा दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला ज्यांना आहे, अशा प्रवाशांची प्राथमिक तपासणी करून गरज वाटल्यास त्यांना सीपीआरमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.

सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे पथक या ठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहे. पथकामध्ये दोन डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत याबाबत खबरदारी घेण्याची पत्रके वाटण्यात येत आहेत.

 

 

Web Title: corona virus - Travelers coming from out of town in central bus stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.