corona virus : पहिल्याच दिवशी ३५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:45 PM2020-09-17T13:45:12+5:302020-09-17T13:47:19+5:30

कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

Corona virus: A survey of 35,000 citizens on the first day | corona virus : पहिल्याच दिवशी ३५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

corona virus : पहिल्याच दिवशी ३५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ३५ हजार नागरिकांचे सर्वेक्षणमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

ह्यमाझे कुटुंब - माझी जबाबदारीह्ण या मोहिमेअंतर्गत बुधवारी पहिल्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची कुटुंब कल्याण केंद्रनिहाय माहिती अशी : कुटुंब कल्याण केंद्र सदर बझारसाठी ८४५ घरांचे व ३४९७ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र कसबा बावडा ९४६ घरांचे व ३६३५ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

कुटुंब कल्याण केंद्र महाडिक माळ १००० घरांचे व ४२८३ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र सिद्धार्थनगर ६४३ घरांचे व २५१७ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र फिरंगाई ९०० घरांचे व ४३३८ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी ८०३ घरांचे व ३१८३ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र मोरे-मानेनगर १०२१ घरांचे व ३९४२ नागरिकांचे  सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

कुटुंब कल्याण केंद्र आयसोलेशन हॉस्पिटल ७७२ घरांचे व ३१८१ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र पंचगंगा हॉस्पिटल ५३८ घरांचे व २०४१ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ५५५ घरांचे व २२२० नागरिकांचे आणि कुटुंब कल्याण केंद्र राजारामपुरी ५९५ घरांचे व १९७२ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

Web Title: Corona virus: A survey of 35,000 citizens on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.