corona virus-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:36 PM2020-03-21T13:36:26+5:302020-03-21T13:38:13+5:30

कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद ठेवले आहे. हा बंद तिन दिवस राहणार आहे. शुक्रवारी दुपारपासून हा बंद पाळण्यात आला असून दिवसभरात पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारीही  बंद ठेवण्यात येणार आहे. 

corona virus - Gandhinagar closures biggest textile market in western Maharashtra | corona virus-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद

corona virus-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंदपाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प 

सतीश पाटील 

शिरोली/गांधीनगर/कोल्हापूर : कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद ठेवले आहे. हा बंद तिन दिवस राहणार आहे. शुक्रवारी दुपारपासून हा बंद पाळण्यात आला असून दिवसभरात पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारीही  बंद ठेवण्यात येणार आहे. 

याबाबत शुक्रवारी पुज्य सिंधी सेंट्रल पंचायत, गांधीनगर , होलसेल, रिटेल व्यापारी, पोलीस यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेतला आहे.

गांधीनगर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि कर्नाटक मधुन खरेदीसाठी लोक येतात खबरदारी म्हणून गांधीनगर बंद ठेवले आहे. गांधीनगर मधील कपड, सॅनिटरी, इलेक्ट्रॉनिक, प्लायवुड, किराणा माल, इलेक्ट्रीकल, फुटवेअर, कटलरी सर्व व्यावसाय बंद आहेत.

सोमवारनंतर मोठे व्यापारीही आपला व्यवसाय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग कामाला आहे. 
 

Web Title: corona virus - Gandhinagar closures biggest textile market in western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.