कोरोना अहवाल निगेटिव्ह :जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:04 AM2020-11-23T11:04:11+5:302020-11-23T11:06:05+5:30

coronavirus, teacher, school, educationsector, कोल्हापूर जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी त्यांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले. शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. पाच हजार ६७० शिक्षकांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले असून अद्यापही बहुतांश शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहेत.

Corona report negative: 772 teachers in the district relieved | कोरोना अहवाल निगेटिव्ह :जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा

कोरोना अहवाल निगेटिव्ह :जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा

Next
ठळक मुद्देकोरोना अहवाल निगेटिव्ह :जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा अद्यापही बहुतांश अहवाल प्रलंबित

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी त्यांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले. शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. पाच हजार ६७० शिक्षकांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले असून अद्यापही बहुतांश शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहेत.

राज्य शासनाने आज, सोमवारपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी कोरोना तपासणीसाठी शिक्षकांनी तपासणी केंद्रांवर गर्दी केली होती. तपासणीसाठी एकदम गर्दी होत असल्याने त्यांची तपासणी तत्पुरती बंद केली आहे.

दरम्यान, पाच हजार ६७० शिक्षकांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले असून प्रयोगशाळेला पाठवले आहेत. यांपैकी रोज १२०० अहवालांची तपासणी होत आहे. यामध्ये आतापर्यंत २६ जणांना कोरोना झाला आहे. रविवारी तपासणी केलेल्यांपैकी ७७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सुदैवाने दिवसभरात एकाही शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. चंदगड येथील १९० शिक्षक, हातकणंगले ५६, पन्हाळा २५० आणि शिरोळ येथील २७६ शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले. उर्वरित शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Corona report negative: 772 teachers in the district relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.