धामोडमध्ये सापडला कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 03:06 PM2020-07-14T15:06:39+5:302020-07-14T15:14:00+5:30

धामोड ( ता. राधानगरी ) येथील स्थानिक रहिवाशी  'कोरोना पॉझीटीव्ह ' आढळले. यामुळेपूर्ण तुळशी खोऱ्यात एकच खळबळ उडाली .

Corona positive patient found in Dhamod | धामोडमध्ये सापडला कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण

धामोडमध्ये सापडला कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण

Next
ठळक मुद्देपाच दिवसाचे कडक लॉकडाऊन ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे

धामोड/कोल्हापूर :  धामोड  ता. राधानगरी ) येथील स्थानिक रहिवाशी  'कोरोना पॉझीटीव्ह ' आढळले. यामुळेपूर्ण तुळशी खोऱ्यात एकच खळबळ उडाली .

या व्यक्तीच्या संपर्कातील २१ जणांचे स्वॅब राधानगरी कोविड सेंटर येथून पाठवले असून त्यांच्या अहवाला नंतर पूढील कारवाई करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ . शेट्ये यांनी सांगितलव .

तर गेल्या कित्येक दिवसापासून शिथील असणारे लॉक डाऊन ग्रामपंचायत प्रशासनाने कडक केले असून ते पाच दिवस राहणार आहे .

कोल्हापूर येथे निमोनियाचे उपचार घेण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोना असल्याची बातमी सकाळी धामोड मध्ये पसरताच संपूर्ण तुळशी परिसरात स्वयंघोषित लॉक डाऊन सदृश्य वातावरण अवघ्या काही मिनीटात तयार झाले . संपूर्ण बाजारपेठ क्षणार्धात बंद झाली .

धामोड हे तुळशी खोरा पंचक्रोशीतील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे . येथे संपूर्ण तुळशी खोऱ्यातील चाळीस ते पन्नास खेडेगावातील लोक जीवनावश्यक वस्तू , बँका व अन्य कारणासाठी येत असतात . सकाळी कोरोनाची एंट्री झाल्याची बातमी पसरताच इथले सर्व व्यवहार बंद झाले .

या व्यक्तिला सतत ताप येऊ लागल्याने त्यांने भोगावती येथील खासगी डॉक्टरांना दाखवल्यानंतर निमोनियाची लक्षणे आढळून आली व पुढील उपचारासाठी ती व्यक्ती कोल्हापूर येथे दाखल झाली .

तेथे त्यांना कोरोना चाचणी करण्याचा आग्रह केल्या नंतर तपासणीत सदर व्यक्तीचा अहवाल अहवाल पॉझीटिव्ह ' आला .

संबधित व्यक्ती गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर येथे उपचार घेत आहे . त्याचा गावाशी संपर्क आलेला नाही . तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने हा परीसर शील केला आहे .

 

Web Title: Corona positive patient found in Dhamod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.