corona in kolhapur-पोलिसांना मिळाले मार्चचे पहिल्या टप्प्यातील वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:28 PM2020-04-10T17:28:02+5:302020-04-10T17:30:17+5:30

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन बुधवारी (दि. ८ एप्रिल) करण्यात आले. राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील वेतन ४०, ५०, ७५ आणि १०० टक्के केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील वेतनाबाबत भविष्यात निर्णय घेण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

corona in kolhapur - Police receive first phase of March pay | corona in kolhapur-पोलिसांना मिळाले मार्चचे पहिल्या टप्प्यातील वेतन

corona in kolhapur-पोलिसांना मिळाले मार्चचे पहिल्या टप्प्यातील वेतन

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांना मिळाले मार्चचे पहिल्या टप्प्यातील वेतन‘कोरोना’चा परिणाम: दोन टप्प्यात केले वर्गीकरण

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन बुधवारी (दि. ८ एप्रिल) करण्यात आले. राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील वेतन ४०, ५०, ७५ आणि १०० टक्के केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील वेतनाबाबत भविष्यात निर्णय घेण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्'ात सुमारे २७८० पोलीस कर्मचारी तर १५४ पोलीस अधिकारी आहेत. यांचे वेतन दरमहा वेळेवर होते. मार्च महिन्याचेही वेतन देण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांनी ३१ मार्च रोजी वेतनपत्रक पारित केले; पण ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने दि. १ एप्रिल रोजी आदेश काढून मार्चचे एप्रिलमध्ये देय वेतन दोन टप्प्यांत देण्याचे आदेश दिले. त्यामध्ये राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन ४०, ५०, ७५ व १०० टक्के असे अनुक्रमे देण्याचा निर्णय घेतला.

परिणामी पोलिसांच्या मार्चच्या पारित केलेल्या वेतनदेयकावर आक्षेप घेऊन परत नवीन शासन निर्णयाप्रमाणे वेतन आकारणी करण्याचे कळविले. त्यानुसार पुढील सहा दिवसांत कार्यवाही पूर्ण करून बुधवारी पोलिसांचे पहिल्या टप्प्यातील वेतन दिले.

अ वर्ग- पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक.
ब वर्ग - साहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, साहाय्यक उपनिरीक्षक
क वर्ग - पोलीस कर्मचारी
ड वर्ग - चतुर्थ श्रेणी पोलीस कर्मचारी


सहा लिपिकांवर २८०० पोलिसांचा भार

सन १९८० पासून पोलिसांच्या संख्येत वाढ झाली; पण लिपिकांच्या संख्येत वाढ नाही. पोलीस मुख्यालयातील सहा लिपिकांवर जिल्'ातील पोलिसांच्या देयक कामाचा भार आहे. तरीही त्यांनी शासनाच्या सुधारित आदेशानुसार दि. २ ते ७ एप्रिलपर्यंत रात्रंदिवस काम करून वेतनाबाबतच्या देयकाचे काम पूर्ण केले.
 

 

Web Title: corona in kolhapur - Police receive first phase of March pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.