सतेज पाटील मंत्रिपदी निवडीबद्दल काँग्रेसचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:11 PM2019-12-31T12:11:41+5:302019-12-31T12:12:54+5:30

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल सोमवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

Congress felicitates Satej Patil for cabinet election | सतेज पाटील मंत्रिपदी निवडीबद्दल काँग्रेसचा जल्लोष

राज्यमंत्रिमंडळात सतेज पाटील यांची निवड झाल्याबद्दल सोमवारी कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कमिटीसमोर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Next
ठळक मुद्देसतेज पाटील मंत्रिपदी निवडीबद्दल काँग्रेसचा जल्लोषकाँग्रेस कमिटीसमोर साखर पेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर : कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल सोमवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कमिटी कार्यालयासमोर हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर पेढे वाटून आनंद द्विगुणित केला.

आनंदोत्सवात विक्रम जरग, संपतराव चव्हाण-पाटील, संजय पोवार-वाईकर, एस. के. माळी, किशोर खानविलकर, डॉ. प्रमोद बुलबुले, बाबूराव कांबळे, किरण मेथे, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरला पाटील, दीपा पाटील, महम्मद शरीफ शेख, प्रदीप चव्हाण, सुलोचना नाईकवडी, वैशाली महाडिक, मंगल खुडे, शुभांगी साखरे, रंजना पवार, उज्ज्वला चौगुले, पूजा आरडे, तानाजी लांडगे, वसंत यलूरकर, मारुती पाटील, प्रदीप शेलार, उमेश पोरलेकर, राहुल मांढरे, मधुकर पाटील, शिराज शेख, संजीव चिकुर्डेकर, सुनील फल्ले, विजयानंद पोळ, सफॅराज रिकीबदार, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

Web Title: Congress felicitates Satej Patil for cabinet election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.