कोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता, ग्रामसमित्यांनी अधिक दक्ष राहावे :  हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 06:39 PM2020-06-27T18:39:52+5:302020-06-27T18:41:07+5:30

कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

Concerns over corona outbreak, village committees should be more vigilant: Hasan Mushrif | कोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता, ग्रामसमित्यांनी अधिक दक्ष राहावे :  हसन मुश्रीफ

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी मशीन व प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी- पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप आंबोळे, गटविकास अधिकारी शरद मगर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता, ग्रामसमित्यांनी अधिक दक्ष राहावे : हसन मुश्रीफगडहिंग्लज येथे स्वॅब तपासणी मशीन व प्रयोगशाळेचे उद्घाटन

गडहिंग्लज : कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी मशीन व प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी- पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले,रेड झोनमधून आलेल्या लोकांनी स्व:ताचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य धोक्यात आणतात.त्यामुळे त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणातच ठेवावे.

यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर,वैद्यकीय अधिक्षक दिलीप आंबोळे, किरण कदम, वसंत यमगेकर,सुरेश कोळकी,महेश सलवादे आदी उपस्थित होते.

माझी झोपच उडाली..!

गडहिंग्लज तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने शंभरी पार केली, हे चिंताजनक आहे.त्यामुळे माझी झोपच उडाली आहे.मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगबाबत कठोर कारवाई करा, अशी सक्त सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
 

Web Title: Concerns over corona outbreak, village committees should be more vigilant: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.