वाणिज्य : उदयनराजे भोसले यांची स्वागत तोडकर यांच्या निवासस्थानी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:26+5:302021-01-22T04:22:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट ...

वाणिज्य : उदयनराजे भोसले यांची स्वागत तोडकर यांच्या निवासस्थानी भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी उदयनराजे यांनी तोडकर यांची उपचार पद्धती आणि त्यांच्या व्याख्यानांबाबत माहिती घेतली.
तोडकरी संजीवनी निसर्गोपचार केंद्राने कोविडकाळात संशोधनात्मक पद्धतीने विकसित केलेल्या टोनो १६ जडीबुटीयुक्त चूर्ण व सुजीवनीय लिक्विड या आयुर्वेदिक औषधांची माहिती जाणून घेतली. कोरोनानंतरच्या काळात नागरिक आरोग्यविषयी जागरूक आहेत. पुन्हा निसर्गोपचाराकडे वळत आहेत, अशा काळात तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. या कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, निसर्गोपचार केंद्राचे सरव्यवस्थापक उदयसिंह जाधव उपस्थित होते.
२१०१२०२१ कोल स्वागत तोडकर
खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वागत तोडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्वागत तोडकर व स्वामिनी तोडकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मेघराज भोसले उपस्थित होते.