जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 09:31 PM2020-07-13T21:31:31+5:302020-07-13T21:35:17+5:30

 साक्षात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज अचानकपणे सीपीआरला भेट देवून थेट कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून वस्तूस्थिती जाणून घेतली.

Collector Daulat Desai's sudden visit to CPR | जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेट

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेट

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेटथेट कोरोना रुग्णांशी संवाद साधत सोयी सुविधांची आणि उपचारांची घेतली माहिती

कोल्हापूर : डॉक्टर येतात का..तपासतात का..जेवण कसे आहे.. नाश्त्यामध्ये काय देतात.. काही अडचण आहे का.. समाधानी आहात ना..

 साक्षात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज अचानकपणे सीपीआरला भेट देवून थेट कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून वस्तूस्थिती जाणून घेतली.


वेळ संध्याकाळी सातची.. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची वाहने नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात न जाता अचानकपणे दसरा चौकाकडे वळल्या. अन् काही वेळातच ती वाहने सीपीआर रुग्णालयात दाखल झाली.

याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. आरती घोरपडे या व्हीसीमध्ये सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी डॉ. अनिता सैबन्नावर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्यासोबत अतिदक्षता विभाग, हिमो डायलेसिस विभाग, ट्रॉमा सेंटर आदींची पाहणी करुन उपचार घेत असणाऱ्या कोरोना रुग्णांशी त्यांनी थेट संवाद साधला.


रुग्णालया मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, उपचार आणि जेवणाचा दर्जा याबाबत सविस्तर माहिती एका पुरुष आणि महिला रुग्णांकडून जाणून घेतली. काही अडचण आहे का? असा थेट प्रश्न विचारुनही त्यांनी जाणून घेतले.

यावेळी नाश्त्यासह योग्य आहार पुरवला जात असून डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची समाधानकारक माहिती रुग्णांनी यावेळी दिली.


याचवेळी रात्र पाळीसाठी येणाऱ्या परिचारिकांशी डॉ. कलशेट्टी यांनी संवाद साधून त्यांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सांगितले. रुग्णांचा स्वॅब घेतल्यापासून त्यांच्याबाबत पुढील होणाऱ्या कार्यवाहीबाबत आणि यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटीत जाणून घेतल्या.


डायलेसिस विभागात अतिदक्षता विभाग करण्याबाबत सूचना करुन महात्मा जोतिराव फुले जीवनदायी योजनेत समावेश असणाऱ्या रुग्णालयांपैकी खासगी रुग्णालयात या विभागातील रुग्णांना उपचारासाठी पाठविण्याबाबतची सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली.

कोरोना रुग्णांसाठीची उपचार सुविधा, वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठीची आरोग्य सुविधा यासह मनुष्यबळ वाढविण्याबाबतही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आणि डॉ. सैबन्नावर यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

Web Title: Collector Daulat Desai's sudden visit to CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.