होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:48 PM2021-03-27T16:48:36+5:302021-03-27T16:50:30+5:30

CoronaVirus Religious programme Kolhapur-कोविड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, उत्सव, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे. यासह होळी, शिमगा, धूलिवंदन व रंगपंचमी हा उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

Celebrate Holi, Dhulivandan, Rangpanchami with simplicity | होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा

googlenewsNext
ठळक मुद्देहोळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे कराकोविड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची सूचना

कोल्हापूर : कोविड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, उत्सव, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे. यासह होळी, शिमगा, धूलिवंदन व रंगपंचमी हा उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

कोल्हापुरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रविवारी हा सण साजरा होत असून सोमवारी धूलिवंदन व २ एप्रिल रोजी रंगपंचमी आहे. यानिमित्त एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने नागरिकांनी उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रार्थना सभांचे ऑनलाइन प्रक्षेपण करा

ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस २ एप्रिलला, तर इस्टर संडे ४ एप्रिलला आहे. हे सण ख्रिस्ती बांधवांनी साधेपणाने साजरे करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी दिल्या आहेत. २८ मार्च ते ४ एप्रिल या ह्यहोली वीकह्णमध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार गर्दीचे व्यवस्थापन करावे. मोठे चर्च असल्यास ५० लोक व जागा कमी असल्यास १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभा घ्यावी.

आवश्यकतेनुसार ४ ते ५ खास प्रार्थना सभा घ्याव्यात. सभेच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉट्सॲप, फेसबुक, यू-ट्यूब यासारख्या सोशल मीडिया माध्यमांतून प्रसारित करावे. मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: Celebrate Holi, Dhulivandan, Rangpanchami with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.