प्रसूती दरम्यान महिलेल्या मृत्यू प्रकरणी  तब्बल १९ महिन्यांनी गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:47 PM2021-01-01T18:47:59+5:302021-01-01T18:50:40+5:30

CrimeNews Police Kolhapur- प्रसूती दरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरासह तीघांवर वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल १९ महिन्यांनी निष्काळजीपने व हयगय केल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला.

Case registered after 19 months in case of death of a woman during childbirth | प्रसूती दरम्यान महिलेल्या मृत्यू प्रकरणी  तब्बल १९ महिन्यांनी गुन्हा नोंद

प्रसूती दरम्यान महिलेल्या मृत्यू प्रकरणी  तब्बल १९ महिन्यांनी गुन्हा नोंद

Next
ठळक मुद्दे प्रसूती दरम्यान महिलेल्या मृत्यू प्रकरणी  तब्बल १९ महिन्यांनी गुन्हा नोंददोन डॉक्टरासह तीघांवर वडगाव पोलिसात गुन्हा

पेठवडगाव: प्रसूती दरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरासह तीघांवर वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल १९ महिन्यांनी
निष्काळजीपने व हयगय केल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत स्त्री रोग तज्ज्ञ डॉ यशवंत केळुसकर, त्यांच्या पत्नी विद्या केळुसकर (दोघे रा.पेठवडगाव),भूल तज्ज्ञ डॉ अनिल शिंदे (रा.कोल्हापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद सुभाष शंकर पाटील(वय ४०,रा.कणेगांव,ता.वाळवा,जि.सांगली) यांनी दिली.
   
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठवडगाव येथील एस टी स्टॅण्ड पाठीमागे केळुसकर हॉस्पीटल येथे स्त्री रोग व प्रसूती प्रसूती उपचार करण्यात येतात. येथे पाटील यांच्या पत्नी अश्वीनी यांच्या पहिल्या मुलीची ही प्रसूती केळुसकर हॉस्पीटल मध्ये करण्यात आली होती.नंतर दुसर्‍यादा प्रसूती पुर्व उपचारासाठी पाटील दांपत्य येत होते.

१२ मे २०१९ ला केळुस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन बी पी वाढला आहे.त्यामुळे सिझेरियन करावे लागेल असे सांगितले. तशी तयारी केली.मात्र पहिल्यांदाच भूल चढली नाही.म्हणून पुन्हा भूल देण्यात आली. यावेळी प्रसूती करण्यासाठी डॉ. यशवंत केळुसकर, भुलतज्ञ डॉ. अनिल शिंदे, सहाय्यक म्हणून विद्या केळुसकर ही उपस्थित होत्या.

उपचारादरम्यान गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानंतर सीपीआर रुग्णालयात त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याप्रकरणी तज्ञांचा अहवाल काही दिवसापुर्वी आल्या नंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस नाईक संदीप गायकवाड करीत आहेत.  

Web Title: Case registered after 19 months in case of death of a woman during childbirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.