तोफ उडाली अन‌् युवकाचा हात फाटला, दुसऱ्याचे डोळे निकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 08:09 PM2020-11-15T20:09:46+5:302020-11-15T20:12:27+5:30

diwali, accident, police, kolhapurnews दीपावलीचा दिवसभर आनंदोत्सव झाला. शनिवारी (दि. १४) सायंकाळी श्री लक्ष्मीपूजनानंतर प्रथेप्रमाणे तोफ उडवली अन‌् अनर्थ घडला. तोफेतील दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. तोफ उडवणाऱ्या युवकाचा हात निकामी झाला; तर दुसऱ्याच्या डोळ्यांत शोभेची दारू गेल्याने त्यालाही रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले, तसेच तिसऱ्या युवकाच्या डोक्याला तोफेचा गोळा घासून गेल्याने तो थोडक्यात बचावला; पण त्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात घडल्याची चर्चा सुरू आहे.

The cannon was fired and the youth's hand was torn, the other's eyes were blinded | तोफ उडाली अन‌् युवकाचा हात फाटला, दुसऱ्याचे डोळे निकामे

तोफ उडाली अन‌् युवकाचा हात फाटला, दुसऱ्याचे डोळे निकामे

Next
ठळक मुद्देतोफ उडाली अन‌् युवकाचा हात फाटला, दुसऱ्याचे डोळे निकामे सिद्धाळा गार्डन परिसरातील घटना : दुर्घटनेत तिघे जखमी; दोघे रुग्णालयात

कोल्हापूर : दीपावलीचा दिवसभर आनंदोत्सव झाला. शनिवारी (दि. १४) सायंकाळी श्री लक्ष्मीपूजनानंतर प्रथेप्रमाणे तोफ उडवली अन‌् अनर्थ घडला. तोफेतील दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. तोफ उडवणाऱ्या युवकाचा हात निकामी झाला; तर दुसऱ्याच्या डोळ्यांत शोभेची दारू गेल्याने त्यालाही रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले, तसेच तिसऱ्या युवकाच्या डोक्याला तोफेचा गोळा घासून गेल्याने तो थोडक्यात बचावला; पण त्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात घडल्याची चर्चा सुरू आहे.

दीपावलीच्या सणानिमित्त यंदा मोठे फटाके उडविण्यास शासनाने निर्बंध घातले. शनिवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर कोल्हापूर शहरात फटाक्यांची आतषबाजी झाली. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात तर चक्क लक्ष्मीपूजनानंतर एका घराण्यात दरवर्षी तोफ उडविली जाते. या घराण्याच्या वतीने पूर्वी शहरातून श्री तुळजाभवानी देवीची सबिना मिरवणूक काढली जात असे; पण काळाच्या ओघात मिरवणूक बंद झाली. त्यातील धातूची तोफ आजही या घराण्याकडे आहे.

शनिवारी श्री लक्ष्मीपूजनानंतर रात्री दहाच्या सुमारास तोफ उडविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भागातील तरुण जमले. त्याच वेळी तोफेचा पहिला बार उडविला. तोफ गरम असतानाच त्यात दुसऱ्यांदा शोभेची दारू ठासून भरत असतानाच अचानक या दारूचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज होऊन धूर पसरला. स्फोटामुळे तोफेत दारू ठेचणाऱ्या युवकाच्या हाताचा पंजा फाटून हातच निकामा झाला; तर बालाजी पार्क परिसरातील युवकाच्या डोळ्यात स्फोटाची दारू उडाल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तोफेचा गोळा तिसऱ्या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने तो मोठ्या दुर्घटनेतून बचावला.

पोलिसांची फक्त पाहणी
दरम्यान, रात्रीच जखमी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली; पण त्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी पाहणी केली; कोणाचीही तक्रार नसल्याने पोलीस प्राथमिक चौकशी करून निघून गेले.

 

Web Title: The cannon was fired and the youth's hand was torn, the other's eyes were blinded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.