चुकीच्या पद्धतीने लावलेला निकाल रद्द करा, जिल्हा युवा सेनेची मागणी, कुलगुरूंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:10 PM2020-09-16T19:10:18+5:302020-09-16T19:11:34+5:30

शिवाजी विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षांचा निकाल चुकीच्या पद्धतीने लावला आहे. हा निकाल रद्द करावा, अशी मागणी जिल्हा युवा सेनेने बुधवारी केली. या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले.

Cancel the wrongly imposed result, demand of District Youth Sena, statement to the Vice-Chancellor | चुकीच्या पद्धतीने लावलेला निकाल रद्द करा, जिल्हा युवा सेनेची मागणी, कुलगुरूंना निवेदन

चुकीच्या पद्धतीने लावलेला निकाल रद्द करा, जिल्हा युवा सेनेची मागणी, कुलगुरूंना निवेदन

Next
ठळक मुद्देचुकीच्या पद्धतीने लावलेला निकाल रद्द कराजिल्हा युवा सेनेची मागणी, कुलगुरूंना निवेदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षांचा निकाल चुकीच्या पद्धतीने लावला आहे. हा निकाल रद्द करावा, अशी मागणी जिल्हा युवा सेनेने बुधवारी केली. या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्यात अडचणी असल्याने पूर्वसत्रामधील गुणांच्या आधारावर पदवीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रथम, द्वितीय वर्षाचा निकाल जो विद्यापीठाने लावला आहे, त्यात चुकीच्या पद्धतीने गुणांकन मिळाल्याने हजारो विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत.

एखादा विद्यार्थी हा पहिल्या सेमिस्टरमध्ये एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला असेल, तर त्याला दुसऱ्या सेमिस्टरलाही अनुत्तीर्ण दाखवले आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे हा चुकीच्या पद्धतीचा निकाल रद्द करावा. त्यामध्ये सुधारणा करावी; अन्यथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने केला.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने, युवती सेनेच्या शीतल कालगोटे, पूनम पाटील, युवा सेनेचे सुदेश आयरेकर, तुकाराम लाखे, साहिल जाधव, प्रसाद जामदार, अथर्व बापट उपस्थित होते.
चौकट

शिवरायांच्या नावाने अध्यासन सुरू करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, कार्य, त्यांचे विचार अधिक चांगल्या पद्धतीने तरुण पिढीसमोर मांडण्यासाठी विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करावे, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

Web Title: Cancel the wrongly imposed result, demand of District Youth Sena, statement to the Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.