शिवसेना आक्रमक : घरफाळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड ; फौजदारीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 01:14 AM2020-01-28T01:14:11+5:302020-01-28T01:15:12+5:30

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आम्ही मिळकती दाखवितो, तुमच्यासमोर भांडाफोड करतो,’ असे सांगत या तिघांना व्हीनस कॉर्नर येथील एका इमारतीत नेले.

Bribery corruption | शिवसेना आक्रमक : घरफाळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड ; फौजदारीची मागणी

घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेने तीन अधिकाऱ्यांना जागेवर दाखवून कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला आहे, याची माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, विजय देवणे यांच्यासह धनंजय आंधळे, संजय सरनाईक, संजय भोसले हे अधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखविल्या मिळकती

कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला. उपायुक्त, सहायक आयुक्त व करसंग्राहक अशा तीन वरिष्ठ अधिकाºयांना शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर नेऊन दोन मिळकतींचा घरफाळा आकारणीत कशा चुका केल्या आहेत, याची माहिती दिली.

ज्यांनी जाणीवपूर्वक मोठ्या करदात्यांचा घरफाळा कमी करून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे, अशा सर्व अधिकाºयांवर आठ दिवसांत फौजदारी कारवाई केली नाही, तर शिवसेनेतर्फे न्यायालयात खासगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
महानगरपालिका घरफाळा विभागात भ्रष्टाचार झाला असून, काही अधिकाºयांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी करून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे, त्याची चौकशी करावी म्हणून दीड महिन्यापूर्वी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना भेटून निवेदन, तसेच काही कागदोपत्री पुरावे दिले होते; परंतु प्रशासनाने दीड महिन्यात चौकशी समिती नियुक्त करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. या चौकशी समितीने अद्याप चौकशीही सुरू केलेली नाही. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी आयुक्त कलशेट्टी यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.

आयुक्त नसल्याने प्रभारी उपायुक्त धनंजय आंधळे यांना शिवसैनिकांचे शिष्टमंडळ भेटले. तेव्हा सहायक आयुक्त संजय सरनाईक, करनिर्धारक संजय भोसले उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आम्ही मिळकती दाखवितो, तुमच्यासमोर भांडाफोड करतो,’ असे सांगत या तिघांना व्हीनस कॉर्नर येथील एका इमारतीत नेले.

व्हीनस कॉर्नर चौकातील एका बॅँकेसमोर या अधिकाºयांना नेले. मिळकतीमध्ये बॅँकेचे कार्यालय असल्याने त्याचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना भाड्याची विचारणा केली तेव्हा महिन्याला एक लाख ७५ हजार रुपये भाडे असल्याचे बॅँक व्यवस्थापकाने सांगितले; परंतु महापालिका दफ्तरी त्याची नोंद मालक वापर असून, घरफाळा कमी असल्याची बाब उघड झाली. आणखी एक हॉस्पिटलचाही घरफाळा चुकल्याची बाब निदर्शनास आली. करनिर्धारक भोसले यांनी घरफाळ्याची आकारणी करण्यात चूक झाल्याचे कबुल केले. यावेळी सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, मेघा पेडणेकर, शुभांगी पोवार,  स्मिता सावंत, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • गुन्हे दाखल करण्याचा आग्रह

शिवसैनिकांनी घरफाळा भ्रष्टाचारास जो कोणी जबाबदार त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा, असा आग्रह तिन्ही अधिकाऱ्यांकडे धरला होता. पोलीस अधीक्षकांकडे चला आम्ही तुमच्या सोबत येतो, असेही सुजित चव्हाण यांनी सांगितले; परंतु महापालिका प्रशासनास एक प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
सध्या चौकशी सुरू असून, ती झाल्याशिवाय गुन्हे दाखल करता येणार नाहीत, असे संजय भोसले यांनी सांगितले. आठ दिवसांत ही चौकशी संपवा; अन्यथा आम्ही फौजदारी दाखल करू, असा इशारा संजय पवार यांनी दिला.

 

  • आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी

घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्त कलशेट्टी यांनी बदली करून घेऊन येथून निघून जावे, अशी मागणी विजय देवणे यांनी केली. शहरात एकीकडे विकासकामांना पैसे नाहीत आणि दुसरीकडे अधिकारी पालिकेचे अशा पध्दतीने नुकसान करीत आहेत, असा आरोपही देवणे यांनी केला.

 

Web Title: Bribery corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.