BJP's ploy to make people unemployed: Satej Patil | सिनेसृष्टीतील लोकांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव : सतेज पाटील

सिनेसृष्टीतील लोकांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव : सतेज पाटील

ठळक मुद्देसिनेसृष्टीतील लोकांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव : सतेज पाटील मुंबईसह महाराष्ट्राचा आत्मा असणारी सिनेसृष्टी संपवण्याचे कटकारस्थान

कोल्हापूर : मुंबईतील सिनेसृष्टीशी संबंधितांना बेरोजगार करण्याचे भाजपचा डाव असल्याचा खळबळजणक आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज, बुधवारी मुंबई येथे होणाय्रा मोठ्या कलाकारांच्या भेटीचा त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पेठेतील मतदान केंद्रावर भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रपट सुष्टीला एक वेगळा इतिहास आहे. भालजी पेंढारकरांपासून ते आतापर्यंत कलाकारांनी मुंबई चित्रपट सुष्टी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. भाजपचे मात्र, मुंबईची शान असणाय्रा सिनेसृष्टीच संपवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. लाखो लोकांचे रोजगार, कोट्यावधीची उलढाला या सिनेसृष्टीवर आवलंबून आहे. येथून एक कलाकार जरी बाहेर गेला तर हजारो लोकांवर परिणाम होणार आहे.

लाईटमन पासून ते निर्मात्यांपर्यंत सर्वांना बेरोजगार करण्याचा भाजपने विडा  उचलल्याची शंका निर्माण होते.
महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सिनेसृष्टी दुसरीकडे जावू देणार नाही. आमचे उद्योग, आमच्याच राज्यात राहिले पाहिजेत. यासाठी राज्यशासन म्हणून जे काही पावले उचलावी लागतील ती उचलू.

उत्तरप्रदेशमध्ये सुविधा उपलब्ध असतील आणि तेथे कोणीही बोलवले तर मुंबईतील कलाकारांनी जाण्यास काही हरकत नाही, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्याचाही पालकमंत्री पाटील यांनी समाचार घेतला.  गेल्या ६० वर्षापासून मुंबई सिनेसृष्टी येथे आहे. सुविधा आहे म्हणूनच येथे त्यांचा व्यवसाय सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.

Web Title: BJP's ploy to make people unemployed: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.