ब्राह्मण समाजाला फसविल्यानेच भाजपचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 06:52 PM2020-12-05T18:52:37+5:302020-12-05T18:55:47+5:30

brahman mahasangh, VidhanParishadElecation, kolhapur ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रम्ह महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

BJP's defeat only by deceiving the Brahmin community | ब्राह्मण समाजाला फसविल्यानेच भाजपचा पराभव

ब्राह्मण समाजाला फसविल्यानेच भाजपचा पराभव

Next
ठळक मुद्देब्रम्ह महाशिखर परिषदेचा दावा मनपा निवडणुकीतही बसणार फटका

कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रम्ह महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्या आम्ही करत आहोत; पण मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना भाजप सरकारने समाजासाठी काहीच केले नाही. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या ब्रम्ह महाशिखर परिषदेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती.

कोल्हापुरातील गोलमेज परिषदेतही जे कोणी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विचार करतील, त्यांना मदत केली जाईल याचा पुनुरुच्चार केला होता. भाजपच्या नेत्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मेधाताई कुलकर्णी यांची आमदारकी हिरावून घेतली.

मिलिंद संपगावकर, शेखर चरेगांवकर यांना केवळ ब्राह्मण म्हणून उमेदवारी नाकारली. त्याचाच फटका भाजपच्या उमेदवारांना बसला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. यावेळी विजय जमदग्नी, प्रदीप अष्टेकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, सूरज कुलकर्णी उपस्थित होते.

फडणवीस कार्यशून्य नेतृत्व..

ज्या शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवले गेले, त्याच पक्षाच्या जिवावर नेते मोठे झाले; पण त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कार्यशून्य माणसाने मागण्या जाणून घेण्याचेही सौजन्य दाखविले नाही. त्यांनी समाजाची फसवणूक केली. यापुढेही कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद महानगरपालिकेत समाजाला दुखावल्याचे परिणाम पाहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी दिला.

नेत्यांची मग्रुरी उतरवली

भाजपच्या नेत्यांना प्रचंड मग्रुरी आली होती. जर पराभव झाला तर हिमालयात जातो असे नेते बोटांच्या चिटक्या वाजवून म्हणत होते. कसली ही मग्रुरीची भाषा. राजकारणात इतकी मग्रुरी चालत नाही हेच आम्ही दाखवून दिले, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: BJP's defeat only by deceiving the Brahmin community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.