मातृभाषेचा आभिमान बाळगा, मानवता धर्म माना : उर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 01:25 PM2019-08-15T13:25:55+5:302019-08-15T13:26:44+5:30

भोसलेवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा, अभिनव बालक मंदिर या शाखा समूहाच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

Be proud of your mother tongue, believe in humanity religion: Urmila Matondkar | मातृभाषेचा आभिमान बाळगा, मानवता धर्म माना : उर्मिला मातोंडकर

मातृभाषेचा आभिमान बाळगा, मानवता धर्म माना : उर्मिला मातोंडकर

googlenewsNext

कदमवाडी/कोल्हापूर : आपली मातृभाषा ही सर्वोच्च असते आणि मराठी भाषा सर्वोच्च आहे म्हणून या मातृभाषेचा नेहमी अभिमान बाळगा. आपल्या मातृभाषेला सन्मान द्या. आणि आयुष्यात एकच धर्म माना, तो म्हणजे मानवता. मानवता धर्म हाच सर्वात महत्त्वाचा आहे, असे मत सिनेअभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या उर्मिला  मातोंडकर यांनी व्यक्त केले.  

भोसलेवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा, अभिनव बालक मंदिर या शाखा समूहाच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या शाळेमध्ये असणाऱ्या पूरग्रस्तांची त्यांनी विचारपूस केली.

या वेळी संस्थापक एम.एच.मगदुम, भरत लाटकर, तनुजा शिपुरकर, अखलाख अन्सारी, रियाज मगदुम, डॉ.अब्दुलखालीक खान, बाळासाहेब गवाणी, संतोष पाटील, अरविंद मेढे, अशोक चौगुले, हसन देसाई, नंदकुमार डोईजड, चंद्रसेन जाधव, विजय पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक  विजय भोगम, मुख्याध्यापिक अरुणा हुल्ले, संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.

Web Title: Be proud of your mother tongue, believe in humanity religion: Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.