शिवाजी विद्यापीठात उद्या ‘सशस्त्रसेना ध्वजदिन’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:59 PM2019-12-06T12:59:31+5:302019-12-06T13:01:11+5:30

शिवाजी विद्यापीठ, शहीद जवान स्फूर्ती केंद्र आणि छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने उद्या, शनिवारी (दि. ७) सकाळी १0 वाजता विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात ‘सशस्त्र सेना ध्वज दिना’चा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये देशभक्तिपर आधारित विविध स्पर्धांतील विजेत्यांना खासदार संभाजीराजे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि फौंडेशनचे शहाजी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'Armed Forces Flag Day' program at Shivaji University tomorrow | शिवाजी विद्यापीठात उद्या ‘सशस्त्रसेना ध्वजदिन’ कार्यक्रम

शिवाजी विद्यापीठात उद्या ‘सशस्त्रसेना ध्वजदिन’ कार्यक्रम

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात उद्या ‘सशस्त्रसेना ध्वजदिन’ कार्यक्रमविविध स्पर्धांतील विजेत्यांचा होणार गौरव; निधीसाठी देणगी देण्याचे आवाहन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, शहीद जवान स्फूर्ती केंद्र आणि छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने उद्या, शनिवारी (दि. ७) सकाळी १0 वाजता विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात ‘सशस्त्र सेना ध्वज दिना’चा कार्यक्रम होणार आहे.

देशभक्तिपर आधारित विविध स्पर्धांतील विजेत्यांना खासदार संभाजीराजे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यामध्ये गौरविण्यात येईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि फौंडेशनचे शहाजी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डी. टी. शिर्के म्हणाले, या ध्वजदिनानिमित्त विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये देशभक्तिपर गीतगायन, वक्तृत्व, चित्रकला, पथनाट्य, आदी स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

शहाजी माळी म्हणाले, स्पर्धेतील विजेत्यांची बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या रेजिमेंटल सेंटर येथे सहल नेली जाणार आहे. सैनिक कल्याण निधीसाठी नागरिकांनी केंद्र सरकारच्या बँक खात्यामध्ये थेट देणगी जमा करून सहकार्य करावे. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी. के. गायकवाड, फौंडेशनचे अमर पाटील, उदय घोरपडे, अलका भगवान, संजय पवार, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: 'Armed Forces Flag Day' program at Shivaji University tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.