‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:36 AM2019-09-17T10:36:11+5:302019-09-17T10:39:53+5:30

सांगलीच्या कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन देऊन त्याबाबतचे निर्देश सचिवांना दिले.

Appointment of competent officers for 'Kadaknath' scam probe: CM assures | ‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Next
ठळक मुद्दे‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

कोल्हापूर : महाराष्ट्रासह परराज्यांतही व्याप्ती असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एमपीआयडी-१९९९’ कायद्यानुसार सक्षम अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी सोमवारी रात्री सांगलीच्या कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन देऊन त्याबाबतचे निर्देश सचिवांना दिले.

कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे अ‍ॅड. अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनातील मागण्यांमध्ये पोलिसांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, कोंबड्यांना खाद्यासाठी रेशनिंगवर खाद्य उपलब्ध करून द्यावे. शासनाने सैन्यदलासाठी कडकनाथचे चिकन व अंडी खरेदी करावे. प्राणी संरक्षण कायद्यानुसार कंपनीवर कारवाई करावी. शिष्टमंडळात अ‍ॅड. अरुणा शिंदे, प्रशांत साळुंखे, जयंत जाधव, महालिंग हेलाडे, अ‍ॅड. दीपक लाड आदींचा समावेश होता.
 

 

Web Title: Appointment of competent officers for 'Kadaknath' scam probe: CM assures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.