जिल्ह्यात आणखी ४० जणांना कोरोना, एका महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:45 AM2020-11-09T11:45:57+5:302020-11-09T11:46:51+5:30

CoronaVirus, Kolhapurnews, Hospital  कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी आणखी ४० जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ४६ जण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सांगली, विटा येथील ६६ वयाच्या महिलेचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत १६५६ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.

Another 40 people were killed in the district | जिल्ह्यात आणखी ४० जणांना कोरोना, एका महिलेचा मृत्यू

जिल्ह्यात आणखी ४० जणांना कोरोना, एका महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी ४० जणांना कोरोना, एका महिलेचा मृत्यूतब्बल ४६ हजार १०१ नागरिकांनी केली कोरोनावर मात

 कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी आणखी ४० जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ४६ जण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सांगली, विटा येथील ६६ वयाच्या महिलेचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत १६५६ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.

आजरा, गगनबावडा, शिरोळ तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. कोल्हापूर शहरात मात्र, २० नव्या रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी तब्बल ४६ हजार १०१ नागरिकांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

सध्या सरकारी, खासगी आणि घरी असे ७२७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ४७३ जण घरातून तर २५४ जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जुलै ते ऑक्टोबरच्या तुलनेत कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी दुसरी लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी कारण नसताना गर्दीत जाणे टाळणे आवश्यक आहे.

Web Title: Another 40 people were killed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.