इचलकरंजीत शिक्षकांच्यावतीने आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:59 AM2020-12-05T04:59:58+5:302020-12-05T04:59:58+5:30

इचलकरंजी : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर व अरुण लाड हे दोघे ...

Anandotsav on behalf of Ichalkaranji teachers | इचलकरंजीत शिक्षकांच्यावतीने आनंदोत्सव

इचलकरंजीत शिक्षकांच्यावतीने आनंदोत्सव

Next

इचलकरंजी : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर व अरुण लाड हे दोघे विजयी झाल्याबद्दल इचलकरंजी शहर परिसरातील सर्व शिक्षकांनी गांधी पुतळा येथे एकत्र येऊन आनंद व्यक्त करत फटाक्यांची आतषबाजी व साखर वाटप केली. आसगावकर यांना निवडून आणण्यासाठी येथील शिक्षकांनी मेळावा घेण्यासह प्रचाराची धुरा हाती घेतली होती. कोल्हापूर जिल्ह्याचा शिक्षक आमदार झाला पाहिजे, हा चंग बांधून जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी एकत्रित येऊन आसगावकर यांना निवडून आणले. यावेळी शेखर शहा, इरफान अन्सारी, पी. डी. शिंदे, मंजुषा रावळ, संजय लोटके, संजय परीट, शंकर पोवार, विनायक सपाटे, उत्तम मोहिते, प्रवीण आंबोळे, आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

(फोटो ओळी) ०४१२२०२०-आयसीएच-०२ इचलकरंजीत शिक्षकांच्यावतीने आसगावकर यांच्या विजयानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

(छाया-उत्तम पाटील)

Web Title: Anandotsav on behalf of Ichalkaranji teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.