नववर्षाच्या पहिल्या दिवशी उघडले अंबाबाईचे महाद्वार; दर्शनासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 10:44 AM2021-01-01T10:44:29+5:302021-01-01T10:45:49+5:30

Mahalaxmi Temple Kolhapur - नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज, शुक्रवारपासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार उघडले. भाविकांनी रांगागरुड मंडप, गणपती मंडप येथे येऊन देवीचे मुखदर्शन घेतले.

Ambabai's entrance opened on the first day of the new year; Queues for darshan | नववर्षाच्या पहिल्या दिवशी उघडले अंबाबाईचे महाद्वार; दर्शनासाठी रांगा

नववर्षाच्या पहिल्या दिवशी उघडले अंबाबाईचे महाद्वार; दर्शनासाठी रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देनववर्षाच्या पहिल्या दिवशी उघडले अंबाबाईचे महाद्वार; दर्शनासाठी रांगामंदिर आवारातील दुकानेही उघडली

कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज, शुक्रवारपासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार उघडले. भाविकांनी रांगागरुड मंडप, गणपती मंडप येथे येऊन देवीचे मुखदर्शन घेतले.

दर्शनाची वेळदेखील एक तासाने वाढवली असून सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेण्याची परवानगी मिळालेली आहे. यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लाउन देवीचे दर्शन घेतले. याशिवाय मंदिर आवारातील दुकानेही उघडण्यात आली आहे.

कोरोनाबाबतची खबरदारी म्हणून अंबाबाई मंदिराचे दोन दरवाजे सध्या बंद आहेत. पण महाद्वारातून देवीचे मुख दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून महाद्वार उघडून भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला आहे. येणारे भाविक गरुड मंडप व गणपती मंडप येथून अंबाबाईचे मुखदर्शन घेऊन पुन्हा महाद्वारातून बाहेर जातात. देवीच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ असून त्यात एक तासाने वाढ करण्यात आली आहे.

आता सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्त अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देवीच्या दारात आलेले आहेत. याशिवाय गेल्या कित्येक दिवसांपासून आवारातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी दुकानदारांनी केली होती. त्यांनाही पुरातत्व खाते व समितीच्या नियमांनुसार व्यवसायाची परवानगी देण्यात आल्याने परिसरातील दुकानेही उघडली आहेत.

Web Title: Ambabai's entrance opened on the first day of the new year; Queues for darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.