आर्या आंबेकर, रोहित राऊतची मंगळवारी लाइव्ह कॉन्सर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 04:32 PM2019-03-30T16:32:58+5:302019-03-30T16:39:29+5:30

सुरेल गायकी आणि लाघवी अभिनयाने अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातलेली गायिका व ‘लोकमत’च्या सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय संगीत पुरस्काराची विजेती आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांचा ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी (दि. २) लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार विजेते शिखर नाद कुरेशी यांचेही गायन होणार आहे.

Ajoy Ambekar, live concert on Rohit Raut's Tuesday | आर्या आंबेकर, रोहित राऊतची मंगळवारी लाइव्ह कॉन्सर्ट

आर्या आंबेकर, रोहित राऊतची मंगळवारी लाइव्ह कॉन्सर्ट

Next
ठळक मुद्देआर्या आंबेकर, रोहित राऊतची मंगळवारी लाइव्ह कॉन्सर्टसूर ज्योत्स्ना पुरस्कार विजेते : शिखर नाद कुरेशीचीही उपस्थिती

कोल्हापूर : सुरेल गायकी आणि लाघवी अभिनयाने अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातलेली गायिका व ‘लोकमत’च्या सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय संगीत पुरस्काराची विजेती आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांचा ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी (दि. २) लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार विजेते शिखर नाद कुरेशी यांचेही गायन होणार आहे.

नव्या पिढीतील गायकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी ‘लोकमत’तर्फे ‘सूर ज्योत्स्ना’ या राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायिका आर्या आंबेकर व शिखर नाद कुरेशी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारप्राप्त कलाकारांचा रंगारंग गाण्यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी कोल्हापूरकर रसिकांना मिळणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होईल. यात सिनेगायक रोहित राऊत हादेखील सुरेल गाणी साद करणार आहे.

या कार्यक्रमासाठी ‘सखी’ सदस्यांना ‘लोकमत’च्या शहर कार्यालयातून सकाळी अकरा वाजल्यापासून प्रवेशिका दिल्या जातील. प्रवेशिकांची संख्या मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्या सखींना प्राधान्य असेल. या कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांनाच उपस्थित राहता येईल.

आर्या आंबेकर

आर्याचा जन्म नागपूरचा. समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दाम्पत्याची ही मुलगी. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे. आर्याची आजीसुद्धा शास्त्रीय गायिका असून त्यांनी आर्या दोन वर्षांची असतानाच तिचे गायनातील कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षांची असताना तिने आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

आर्याच्या सांगीतिक प्रवासाला ‘सारेगमप लिटल चॅम्प’ने खरा आयाम दिला. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गाइली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणूनही समोर आली आहे. २०१७ च्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.

यामध्ये तिने गायलेले ‘हृदयात वाजे समथिंग’ हे गाणे प्रसिद्ध आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत तिने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असोत वा भक्तिगीते. मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी; इतकेच नव्हे तर, लावणी, लोकगीते या सर्व शैलींतील गाणी ती तितक्याच ताकदीने गाते.

शिखर नाद कुरेशी

शिखर नाद कुरेशी हे महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव व शिष्य. ख्यातनाम तबलावादक उस्ताद अल्लारखॉँ यांचे नातू आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे पुतणे होत. त्यांच्या वडिलांनी तबलावादन कलेचा आफ्रिकन ड्रम डीजैबेवर प्रयोग केला होता. शिखर नाद कुरेशी यांनी ही संकल्पना पुढे नेली. त्यांनी लोकप्रिय कलावंत विक्कू विनायकरामजी व काका उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत अनेक कार्यक्रम सादर केले. तसेच, लुईस बॅँकस, रणजित वारोत, निलाद्रीकुमार व शंकर महादेवन यांच्यासोबतही विविध कार्यक्रमांत ते सहभागी झाले.

ते पुरबयान चॅटर्जी, रवी चॅरी, विजय प्रकाश, राहुल देशपांडे या भारतीय कलावंतांसह आंतरराष्ट्रीय कलावंत जॉर्ज ब्रुक्स, टॉर्स्टेन डी विंकेल, मार्कस गिलमोरे आणि बॉलिवूडमधील महालक्ष्मी अय्यर, सलीम-सुलेमान, शंकर-एहसान-लॉय यांच्यासोबत ते नियमित कार्यक्रम करीत असतात. बॉलिवूड चित्रपटांकरिता ते संगीतरचना करीत असतात. त्यांनी आयएसएल, आयपीएल, ब्रिक्स समिट गोवा, पॅसिफिक नेशन्स मीट जयपूर, इत्यादी कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या संगीतात योगदान दिले. त्यांनी विविध सूफी पॉप अल्बम्सची निर्मिती केली व मराठी चित्रपट ‘झिपऱ्या’ला पार्श्वसंगीत दिले.

रोहित राऊत

‘सारेगमप लिटल चॅम्प’ कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहोचलेले रोहित राऊत यांनी ‘हिंदी सारेगमप मेगा चॅलेंज’ या कार्यक्रमात विजेतेपद पटकावले. त्यांनी ‘दुनियादारी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. आजवर त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांच्या शीर्षकगीतांसाठीही गायन केले आहे. कॉफी आणि बरंच काही, प्यारवाली लव्ह स्टोरी, शिनमा, ती सध्या काय करते, बॉईज २, बसस्टॉप, आनंदी गोपाळ, का रे दुरावा ही त्यांतील ठळक नावे. याशिवाय त्यांनी विविध गाजलेल्या मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. सारेगमप संगीतसम्राट, तुमचं आमचं जमलं या कार्यक्रमांसाठी त्यांनी निवेदकाची भूमिकाही पार पाडली आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, मिरची म्युझिक अवॉर्ड अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 

 

Web Title: Ajoy Ambekar, live concert on Rohit Raut's Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.